ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या वही सिकंदर; उद्धव ठाकरेंचा बिहर विजयावरू भाजपला टोला
ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार येतंय.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएचा दारूण पराभव (NDA) होईल अशी चर्चा असतााच तब्बल २०२ जागा मिळवत महायुती सत्तेत आली आहे. तर, महाआघाडीला फक्त ३५ जागा मिळवता आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एनडीएने मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही जाहीर केला नाही, कदाचित हेच त्यांच्या बहुमताचं गणित असेल, कारण आपल्याकडे महाराष्ट्रातही त्यांना मोठं बहुमत मिळालं. परंतु, तरीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला त्यांना काही कालावधी लागला. अशाच प्रकारचं बिहारमध्येही सुरू आहे. मग एवढं मोठं बहुमत मिळूनही अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला वेळ का लागतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जितन राम मांझी आणि कुटुंबाची करामत; सून, विहीणबाई आणि जावई घरातले सगळेच झाले आमदार
असं आहे की आपले मुख्यमंत्री म्हणाले की जो जीता वही सिकंदर, मात्र, सिकंदर बनण्यामागचं राज आजपर्यंत कोणी समजू शकलेलं नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचं अभिनंदन. मात्र, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की तेजस्वी यादव यांच्या सभेला जो मिळणारा प्रचंड प्रतिसाद होता, मग तो प्रतिसाद खरा होता की एआयने तयार केलेली माणसे होते असा टोला त्यांनी लगावला आहे.
ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार येतंय असं म्हणत या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलिकडचं आहे, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर बिहारमध्ये महिलांना १० हजार रुपये देण्याच्या योजनेच्या फॅक्टरबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.
महिलांना पैसे वाटण हा फॅक्टर झाला. याचा कदाचित काहीसा फरक पडलाही असेल. पण तेथील लोक ज्या समस्या भोगत आहेत, ते एवढ्या लवकर बदलतील असं वाटत नाही. पण आता ठिक आहे की, जो जीता वही सिकंदर, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
