‘जेनझी कितीतरी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवतात’; रामदेव बाबांच्या व्यक्तव्याने नवा वाद

Ramdev Baba On Gen z Protest जेनझी (Gen Z) पिढीच्या काही भूमिकांचे कौतुक केले, तर त्यांच्या काही सवयींवरून टीकाही केली.

ramdev baba on Gen Z

Ramdev Baba on Gen Z : योगगुरू रामदेव बाबा यांनी जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना जेनझी (Gen Z) पिढीच्या काही भूमिकांचे कौतुक केले, तर त्यांच्या काही सवयींवरून टीकाही केली. जेनझी मधील तरुण चांगले काम करत आहेत, मात्र काही तरुण हिंसाचारात सहभागी होत असून त्यांना चुकीच्या सवयी लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगेंनी रुग्णालयातूनच घेतला मोठा निर्णय; उद्या अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक

रामदेव बाबा यांनी तरुणांच्या जीवनशैलीवरही भाष्य केले. काही जेनझी तरुण अनेक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ठेवतात, तसेच दारू आणि सिगारेटचे सेवन करतात, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान, देशातील परिस्थिती योग्य नसल्याचे चित्र काही जणांकडून जाणीवपूर्वक निर्माण केले जात असल्याचा आरोपही रामदेव बाबांनी केला. काही लोक हे आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे त्यांनी म्हटले. तर काही जण आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Hockey World Cup 2026 भारताची शानदार सुरुवात; वेल्सवर दणदणीत विजय

रामदेव बाबांनी शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारलाही थेट इशारा दिला. शिक्षण क्षेत्रात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या नाहीत, तर आपण स्वतः मोठे आंदोलन उभारू, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकीकडे जेनझी पिढीच्या आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक आणि दुसरीकडे त्यांच्या जीवनशैलीवर केलेली टीका, तसेच शिक्षण व्यवस्थेबाबत सरकारला दिलेला इशारा यामुळे रामदेव बाबांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

“त्यांना रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे”; सिस्पे घोटाळ्यावरून सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला

 

 

 

 

follow us