सौरव दास आणि आशुतोष रांकाची तिहार तुरुंगात रवानगी; न्यायालयाकडून 5 दिवसांची कोठडी

CJP Leaders Saurav Das Ashutosh Ranka; सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

CJP Leaders Saurav Das Ashutosh Ranka in Tihar Jail

CJP Leaders Saurav Das Ashutosh Ranka in Tihar Jail: कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीच्या विशेष न्यायदंडाधिकारी महेश कुमार मीना यांनी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. नवी दिल्ली परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

SIR विरोधात राहुल गांधींची याचिका दाखल; सर्वोच्च न्यायालयात 26 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता

सुटकेनंतर पुन्हा आंदोलनाचे आवाहन

न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी एक वर्ष शांतता राखण्याचे आणि चांगले वर्तन करण्याचे हमीपत्र दिले होते. मात्र, सुटका झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून जंतर मंतरवर आंदोलन करण्याचे आवाहन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी यापूर्वी दिलेल्या हमीचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने नमूद केले.

जेडीयू कार्यालयाच्या आवारातून जंतर मंतरवर प्रवेश

13 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 9 वाजता दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक जवळच असलेल्या जनता दल युनायटेडच्या (JDU) कार्यालयाच्या आवारातून उड्या मारून जंतर मंतर परिसरात पोहोचल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानंतर तेथे घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

युपीतील सौरभ राजपूत हत्याकांडात कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कानसह प्रियकर साहिलला फाशीची शिक्षा

विमानतळावरही पोलिसांशी वाद झाल्याचा आरोप

याआधी 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर उतरल्यावर पोलिसांनी दोन्ही नेत्यांना शांतता राखण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी पोलिसांशी आक्रमकपणे वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 126 आणि 170 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.

सोशल मीडिया व्हिडिओ न्यायालयात सादर

पोलिस उपनिरीक्षक मोहित भाटी यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, सुटकेनंतरही दोन्ही नेत्यांनी व्हिडिओ तयार करून लोकांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओंचे पुरावे पेन ड्राइव्हच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आरोपींच्या वर्तनातून शांतता राखण्याच्या हमीचे पालन होत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला.

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयची हायकोर्टात धाव; पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींच्या सुटकेला आव्हान

19 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

दोन्ही नेत्यांविरोधात BNSS च्या कलम 130 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. योग्य जामीनदार सादर न केल्याने आणि सार्वजनिक शांतता कायम राखण्याच्या दृष्टीने त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सीजेपीचे आणखी एक नेते अजिंक्य शिंदे यांच्याकडून सहा महिने शांतता राखण्याचे हमीपत्र आणि पाच हजार रुपयांचा बाँड घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.

follow us