पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयची हायकोर्टात धाव; पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींच्या सुटकेला आव्हान

Pawanraje Nimbalkar Murder Case; पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आठ आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

Pawanraje Nimbalkar Murder Case

Pawanraje Nimbalkar Murder Case: खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) याचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणी सीबीआयने (CBI) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने 20 जून रोजी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. सीबीआयला आरोंपीविरोधात ठोस पुरावे मांडता आले नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयने दाखल कलेल्या याचिकेत म्हटले की, सत्र न्यायालयाने दिलेला निकाल कायद्याच्या दृष्टीने चूकीचा असून तो रद्द करावा.

रक्तदात्यांना टायटनची घड्याळं, मुंबईत तीन रक्तकेंद्रांचे एफडीएकडून थेट परवाने निलंबित

पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहनचालक समद काझी यांच्या दुहेरी हत्येच्या प्रकरणात सीबीआयला न्यायालयाने 20 जून रोजी महत्त्वाचा निकाल दिला. पुरेसे ठोस पुरावे सादर न झाल्याने या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील (Padamsinh patil) यांच्यासह आठही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

‘अमित शहांची नजर कमजोर, त्यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे’; संजय राऊतांची बोचरी टीका

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 316 पानांच्या निकालपत्रात कळंबोली पोलीस, नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि सीबीआयच्या तपासातील त्रुटी स्पष्ट केल्या. या खटल्यातील प्रमुख आधार असलेला माफीच्या साक्षीदार पारसमल जैन यांची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून समोर आले.

IITian Baba Death : आयआयटीयन बाबांचे निधन, हॉटेलमध्ये सापडला मृतदेह?

त्यामुळे सरकारी पक्षाची बाजू कमकुवत झाली आणि न्यायालयाने संशयाचा फायदा देत पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, महात्मा उर्फ पिंटू सिंग आणि ग्यानेंद्र छोटे पांडे या आठ जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळेच सीबीआयने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता या आठवड्यात न्यायमूर्ती एस. व्ही. कोटवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

follow us