‘पंजाबींना लढायचं कसं, हे शिकवू नका’; गायक दिलजीत दोसांझ अभिजीत दिपकेवर भडकला, दिपकेनी माफीच मागितली

Diljit Dosanjh Abhijit Dipke Controversy; नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान अभिजीत दिपकेने दिलजीत दोसांझवर टीका केली, त्यावर दिलजीतने उत्तर दिले.

Diljit Dosanjh Abhijit Dipke Controversy

Diljit Dosanjh Abhijit Dipke Controversy: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी ‘मी कलाकार आहे, राजकारणी नाही’, असं म्हणत आंदोलनापासून दूर राहणारा गायक दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये दिलजीतने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं. ‘पंजाबींना लढायला कसं शिकायचं हे शिकवू नका,’ असा टोला त्याने लगावला. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी दिलजीतची जाहीर माफी मागितली आहे.

पावसाच्या खंडामुळं रब्बी हंगामाचं नियोजन रखडलं; 3 जिल्ह्यांत पेरणीचं आव्हान

नेमकं प्रकरण काय?

जून 2026 मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर नीट पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात CJP कडून आंदोलन करण्यात येत होतं. यावेळी एका चाहत्याने दिलजीत दोसांझला इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला होता.

त्यावर दिलजीतने, ‘मला आंदोलन आणि अशा गोष्टींपासून दूर ठेवा. मी कलाकार आहे, राजकारणी नाही,’ असं उत्तर दिलं होतं. या वक्तव्यामुळे CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्याच्यावर टीका केली होती. सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये काम करणारा दिलजीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भूमिका घेण्यापासून दूर का राहतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

‘पंजाबींना लढायला शिकवू नका’

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) झालेल्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने या वादावर भाष्य केलं. तो म्हणाला, ‘मी कलाकार आहे, त्यामुळे शांत आहे. मला शांत राहू द्या. मी सर्वांना पाठिंबा देतो. पण पंजाबींनी लढावं कसं हे त्यांना शिकवू नका.’

महिलेच्या घरात घुसला, बंदूक काढली अन्…वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर गुन्हा

यावेळी त्याने आपल्या ‘सतलुज’ या चित्रपटाची खिल्ली उडवल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. हा चित्रपट मानवी हक्क कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी आम्ही खूप काळ संघर्ष केला आहे, असंही दिलजीतने सांगितलं. कोणाला माझा द्वेष करायचा असेल तर करू द्या, पण माझं सर्वांवर प्रेम आहे, अशी भूमिकाही त्याने मांडली.

अभिजित दिपकेंनी मागितली माफी

दिलजीतच्या या वक्तव्यानंतर अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. जूनमध्ये आंदोलन सुरू असताना दिलजीतच्या वक्तव्यामुळे आपल्याला वाईट वाटलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

‘पाजी, तुमच्याबद्दल माझ्या मनात कधीही वैयक्तिक राग नव्हता. तुम्ही नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे कलाकार आहात, असं मला वाटत आलं आहे. त्यामुळेच तुमच्या त्या वक्तव्याचा मला त्रास झाला,’ असं दिपके यांनी म्हटलं.

उजनीतील AI डेटा सेंटरविरोधात रोहित पवारांचे आंदोलन; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

पुढे त्यांनी दिलजीतबद्दलचा आदर कायम असल्याचं सांगितलं. ‘एका मतभेदामुळे किंवा गैरसमजामुळे माझ्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर कमी झालेला नाही. बाकी पाजी, छोटा भाऊ समजून माफ करा आणि हा विषय इथेच सोडून द्या,’ अशा शब्दांत त्यांनी दिलजीतला हा विषय सोडून देण्याची विनंती केली.

नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान सुरू झालेला हा वाद आता दिलजीतच्या दिल्लीतील कॉन्सर्टनंतर पुन्हा चर्चेत आला असून, अभिजित दिपके यांच्या माफीनंतर या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

follow us