‘ज्ञानेश कुमार मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत आहेत’; अभिजीत दिपकेचे गंभीर आरोप!
Abhijit Dipke And Neha Bora Press Conference: अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.
Abhijit Dipke And Neha Bora Press Conference: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा (Neha Bora) यांनी दिल्लीत आंदोलन सुरू ठेवलं आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप करत सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच, या आंदोलनाचं वार्तांकन करण्यापासून दिल्ली पोलीस पत्रकारांना रोखत असल्याचा आरोप नेहा बोरा यांनी केला.
देशात पहिल्यांदाच ‘खुशी विभाग’ सुरू होणार? लोकांच्या हॅप्पीनेसवर मोजली जाणार प्रगती…
‘हे आंदोलन प्रत्येक मतदाराचं’
नेहा बोरा म्हणाल्या, “दिल्ली पोलीस पत्रकारांना हे आंदोलन कव्हर करू देत नाहीत. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचं नसून देशातील प्रत्येक मतदाराचं आहे. आम्ही आंदोलन करत असताना दिल्लीच्या रस्त्यांवरून पोलीस आम्हाला फरफटत नेतात. तेव्हा ते केवळ आम्हाला नाही, तर लोकशाहीला फरफटत नेत आहेत. एसआयआर (SIR) प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या 13 कोटी मतदारांनाही ते फरफटत नेत आहेत.” असे आरोप नेहा बोराने दिल्ली पोलिसांवर केलेत.
‘ज्ञानेश कुमारांकडून मोदींना नेमकं काय मिळतंय?’
अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेतलं. दिल्लीतल्या मेट्रो, रेल्वे बंद केल्या आणि जम्मू-काश्मीरमधून सुरक्षा दलं बोलावली. नरेंद्र मोदींनी संपूर्ण दिल्ली ठप्प करून टाकली. एका ज्ञानेश कुमारांसाठी असं का केलं जात आहे? ज्ञानेश कुमारांकडून नरेंद्र मोदींना नेमकं काय मिळतंय?”
भाजपने उमेदवारी दिली पण मामा सतेज पाटलांचा सल्ला अन् पाठिंबा मिळाला? स्मिता जाधव म्हणाल्या…
जंतरमंतरवर तिरंगा फडकवण्यासाठी गेलेल्या आशुतोष रांका आणि सौरव दास यांना तुरुंगात पाठवल्याचा आरोपही दिपके यांनी केला. “आपल्या देशात तिरंगा फडकवणं कधीपासून गुन्हा झालं आहे? नरेंद्र मोदींना तिरंग्यापेक्षा ज्ञानेश कुमार प्रिय आहेत. दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेचं स्वरूप दिलं आहे. एका ज्ञानेश कुमारांसाठी एवढं सगळं का? याचा अर्थ ज्ञानेश कुमार नरेंद्र मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत आहेत,” असा आरोप दिपकेंनी केला.
‘वन नेशन, वन पार्टी’चा आरोप
केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेवरही अभिजीत दिपके यांनी टीका केली. “यांचं ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे फक्त एक घोषवाक्य आहे. त्यांना देशात ‘वन नेशन, वन पार्टी’ करायचं आहे,” असं ते म्हणाले.
सहर शेखच्या वडिलांची शिंदेसेनेत वर्णी? युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततांच्या मुद्द्यावरून सीजेपीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांनी आंदोलनादरम्यानच्या पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.