युपीतील सौरभ राजपूत हत्याकांडात कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कानसह प्रियकर साहिलला फाशीची शिक्षा

Death penalty murder case of Saurabh Rajput या प्रकरणात आता न्यायालयाने मोठ निर्णय दिला आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Death Penalty Case Of Saurabh Rajput

Death penalty for Muskan and her lover Sahil Major court verdict in UP ‘Blue Drum’ murder case of Saurabh Rajput : गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील मेरठमधील इंदिरा नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. येथे एका पत्नीने तिच्या प्रियकरासह (Meerut Saurabh Murder Case) मिळून पतीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात आता न्यायालयाने मोठ निर्णय दिला आहे. आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी (Muskaan Rastogi) आणि प्रियकर साहिल शुक्ला (Sahil Shukla) याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयची हायकोर्टात धाव; पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींच्या सुटकेला आव्हान

या हत्याकांडात न्यायालयाने यापूर्वीच मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. आज, 14 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

फेरमतमोजणीचं मूळ व्हिडीओ रेकॉर्डिंग कुठं गेलं?, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं

मात्र ही शिक्षा सुनावण्यापूर्वी दोन्ही दोषींची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती समोर आली होती. साहिलने गेल्या तीन दिवसांपासून बोलणे बंद केल्याची माहिती समोर आली होती. तर मुस्कानने आपली मोठी मुलगी पीहू हिची भेट घडवून आणण्याची मागणी केली होती. मेरठ न्यायालयाने दोघांच्या शिक्षेवरील सुनावणीसाठी आजचा दिवस निश्चित केला होता. मेरठ न्यायालयात शिक्षा सुनावण्यासाठी मुस्कान आणि साहिल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यावेळी दोघेही प्रचंड घाबरलेले दिसत होते. दोघांना काही वेळाने तुरुंगातून न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

रक्तदात्यांना टायटनची घड्याळं, मुंबईत तीन रक्तकेंद्रांचे एफडीएकडून थेट परवाने निलंबित

यामध्ये पीडित कुटुंबीयांनी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपींना फाशीपेक्षा कमी शिक्षा मान्य नसल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले होते. सौरभची आई रेणू राजपूत यांनी यापूर्वीच न्यायासाठी उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी रेणू यांनी आपल्या घरी पूजाही सुरू केली होती.सौरभच्या कुटुंबीयांकडून सातत्याने दोन्ही दोषींना फाशी देण्याची मागणी केली जात होती. मुस्कानच्या कुटुंबीयांनीही तिची साथ सोडली होती. त्यांनी देखील सौरभच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.

नेमकं प्रकरण काय?

मेरठमधील ब्रह्मपुरी परिसरात 3 मार्च 2025 च्या रात्री मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी मिळून पती सौरभ हत्या केली होती. मुस्कानने जेवणात गुंगीचे औषध मिसळून पती सौरभला बेशुद्ध केले. त्यानंतर सौरभच्या छातीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. शरीराचे तुकडे निळ्या ड्रममध्ये भरून त्यात सिमेंट टाकून ते बंद करण्यात आले.

हा गुन्हा केल्यानंतर 4 मार्च रोजी मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशात फरार झाले होते. त्यानंतर 18 मार्च रोजी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर ड्रममधून सौरभचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू होती. 30 सप्टेंबर रोजी मेरठ जिल्हा न्यायालयाने सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना हत्या तसेच पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानंतर आज, 14 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.

 

follow us