“मी तुमच्यासोबत आहे, चिंता करू नका”; फुटीर खासदारांना मोदींनी दिला धीर

Narendra Modi Meets MPs मोदींनी ठाकरे गटातील खासदारांना "तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, मी तुमच्यासोबत आहे," असा विश्वास दिला.

Narendra Modi Meets MPs

Prime Minister Narendra Modi Meets Ruling Alliance and NDA MPs : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (7 ऑगस्ट) एनडीएतील (NDA) घटक पक्षांच्या सुमारे 45 खासदारांशी नाश्त्यावर संवाद साधत संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यावर भर दिला. संसदेतील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवा, मतदारसंघाच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करा आणि कोणत्याही अडचणीसाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधा, असा स्पष्ट संदेश त्यांनी खासदारांना दिला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातून शिंदे गटात आलेल्या खासदारांनाही (Shinde MPs) त्यांनी “तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, मी तुमच्यासोबत आहे,” असा विश्वास दिला.

धिंड काढणाऱ्या पोलिसांना शिस्तभंग कारवाईचा इशारा, पुणे पोलीस आयुक्तालयाचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश

बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षासह एनडीएतील विविध घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते. एनडीए हे केवळ राजकीय आघाडी नसून एक कुटुंब आहे, अशी भावना व्यक्त करत मोदी यांनी सर्व मित्रपक्षांना समान सन्मान आणि संधी दिली जाते, असे स्पष्ट केले.

“संसदेचा इतिहास वाचा, चर्चेत प्रभावीपणे सहभागी व्हा”

नवीन खासदारांनी संसदेच्या कामकाजाचा सखोल अभ्यास करावा, असा सल्ला देताना पंतप्रधान म्हणाले की, संसदेच्या इतिहासाशी संबंधित मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करून चर्चेत प्रभावीपणे सहभागी व्हा. प्रत्येक खासदाराने आपल्या राज्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे. राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास अधिक वेगाने होईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेत नवे कर विधेयक मंजूर; विदेशी गुंतवणूकदारांना काय फायदा होणार ?

“मी प्रत्येक खासदाराच्या पाठीशी आहे”

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे गटात आलेल्या खासदारांशी संवाद साधताना मोदींनी त्यांना धीर दिला. एनडीएमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला जातो. आम्ही केवळ एखाद्या मित्र पक्षाच्या नव्हे, तर एनडीएतील प्रत्येक खासदाराच्या पाठीशी आहोत. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संसदेतील गोंधळावर व्यक्त केली चिंता

संसदेच्या कामकाजात सातत्याने होणाऱ्या गदारोळाबाबतही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. संसद ही लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असून तिचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. संसदेत वारंवार होणाऱ्या गोंधळामुळे नव्याने निवडून आलेल्या खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाही. हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे मोदी यांनी नमूद केले. सरकारने संसद सुरळीत चालावी यासाठी विरोधकांशीही चर्चा केली आहे. मात्र गोंधळामुळे ना विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलण्याची संधी मिळते, ना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Video : सूर्यावरचं मोठं रहस्य अखेर कॅमेऱ्यात; पृथ्वीवर याचा नेमका काय परिणाम होणार?

मतदारसंघाच्या विकासावर भर

प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील विकासकामांना गती द्यावी, असे आवाहन करत मोदी यांनी कोणत्याही प्रकल्पात अडचण आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले. केंद्र सरकार आणि पीएमओ सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या मतदारसंघाची आणि वैयक्तिक आरोग्याचीही विचारपूस केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबाबत त्यांनी विशेष चौकशी करत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

पार्थ पवारांशी मराठीत संवाद

बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी काही वेळ एकांतात चर्चा केली. यावेळी त्यांनी मराठीत संवाद साधत, “आई कशी आहे? त्यांची काळजी घ्या,” अशी विचारपूस केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या प्रकृतीची मराठीत चौकशी केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. या बैठकीतून पंतप्रधानांनी एनडीएतील सर्व घटक पक्षांना एकजुटीचा संदेश देतानाच संसदेत अधिक सक्रिय सहभाग, मतदारसंघाचा विकास आणि केंद्र सरकारशी थेट समन्वय यावर विशेष भर दिल्याचे स्पष्ट झाले.

‘प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल’ प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना स्पष्ट इशारा; तटकरेंवर नाराजी?

follow us