बेकायदेशीर सभा अन् आदेशांचे उल्लंघन, ‘सत्याचा मोर्चा’ च्या आयोजकांवर पोलिसांची कारवाई

Satyacha Morcha : राज्यात सध्या मतदार यादीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक

  • Written By: Published:
Satyacha Morcha

Satyacha Morcha : राज्यात सध्या मतदार यादीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत आहे. काल मुंबईत राज ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढला होता. या मोर्च्यातून विरोधी पक्षांकडून भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका करण्यात आली. तर आता सत्याचा मोर्चा आयोजन करण्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

माहितीनुसार, मुंबई पोलीस ‘सत्याचा मोर्चा’ च्या (Satyacha Morcha) आयोजकांवर गुन्हे दाखल करत आहे. मनसे (MNS) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) काढण्यात आलेल्या या मोर्च्याला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र तरीही देखील या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याने आता मुंबई पोलीस (Mumbai Police) आयोजकांवर कारवाई करताना दिसत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वामुंळे मुंंबई पोलिसांनी विरोधी पक्षाच्या या मोर्च्याला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे.  प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहे.

चाहत्यांना धक्का, IPL 2026 मध्ये संजू सॅमसन अन् केएल राहुल बदलणार संघ; ‘या’ संघाकडून खेळणार

तर दुसरीकडे या मोर्च्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत जेव्हापर्यंत मतदार यादीतील चूका दुरुस्त होत नाही तेव्हापर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपने मुक मोर्चा काढत उत्तर दिले. भाजपने या मोर्च्याला फेक नरेटिव्ह म्हणत विरोधक जिंकले की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशी विरोधकांची भूमिका आहे असा प्रत्युत्तर भाजपकडून विरोधकांना देण्यात आले आहे.

follow us