चाहत्यांना धक्का, IPL 2026 मध्ये संजू सॅमसन अन् केएल राहुल बदलणार संघ; ‘या’ संघाकडून खेळणार

Sanju Samson : बीसीसीआयसह सर्व संघांनी देखील आयपीएल 2026 जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी लवकरच मिनी लिलाव देखील होणार

  • Written By: Published:
Sanju Samson

Sanju Samson : बीसीसीआयसह सर्व संघांनी देखील आयपीएल 2026 जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी लवकरच मिनी लिलाव देखील होणार मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आयपीएल 2026 पूर्वी भारतीय संघाचे दोन स्टार खेळाडू संघ बदलण्याची तयारी करत आहे.

माहितीनुसार, संजू सॅमसन (Sanju Samson) आणि के. एल. राहुल (K.L. Rahul) आयपीएल 2026 मध्ये नवीन फ्रँचायझीकडून खेळताना दिसणार आहे. संजू राजस्थान राॅयलचा संघ तर के. एल. राहुल दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, संजू सॅमसन आणि केएल राहुल आयपीएल 2026 (IPL 2026) पूर्वी संघ बदलणार आहे.

केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स सोडून कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) सामील होऊ शकतो तर संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होणार आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स राहुलला सोडण्यास तयार नाही याचा मुख्य कारण म्हणजे राहुलचे मजबूत ब्रँड व्हॅल्यू आणि कामगिरी आहे. तर केकेआर संघासाठी नवीन कर्णधार आणि भारतीय विकेटकिपर फलंदाज शोधत असल्याने राहुलला ऑफर देत आहे.

कोंढवा गोळीबार प्रकरण ; पोलिसांची चार तासांत धडाकेबाज कारवाई आरोपींना केली अटक

तर दुसरीकडे आयपीएल 2026 मध्ये संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्सचा भाग असू शकतो. राजस्थानचा संघ ट्रिस्टन स्टब्सच्या बदल्यात संजूला दिल्लीच्या संघात दाखल होण्याची मंजुरी देऊ शकते. संजू सॅमसन 2016 आणि 2017 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. यापूर्वी त्याने 2016 आणि 2017 मध्ये आयपीएलमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने  2016 मध्ये 14 सामन्यांमध्ये 26.45 च्या सरासरीने 291 धावा केल्या, तर 2017 मध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 27.57 च्या सरासरीने 386 धावा केल्या.

follow us