मग तुम्हाला आडवलंय कुणी?…., सत्याचा मोर्चामधून राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला थेट सवाल

या मोर्चात हजारो लोकांसह राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 01T154337.095

मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने (Mumbai) आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली. मतदार याद्यांतील घोळ संपवल्याशीवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी राज ठाकरे यांनी यावेळी पुन्हा केली आहे.

या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या मोर्चाच्या माध्यमातून मतदारयाद्या स्वच्छ करा, दुबार मतदारांची नावे हटवा, या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून, निवडणूक आयोगाला दिला गर्भित इशारा

सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलताय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलताय…मग निवडणुका घ्यायची घाई का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं, हे स्पष्ट होईल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी सभेत दुबार मतदारांचा पुरावा देखील दिला.

आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांना घेऊन आलोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील पाहात बसले. राज ठाकरेंनी सभेसाठी उपस्थित असलेल्या माणसांमध्ये दुबार मतदारांच्या याद्यांची कागदपत्रं ठेवली होती.

ही सर्व दुबार मतदार आहेत. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा, प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा सूचना राज ठाकरेंनी यावेळी दिल्या.

follow us