मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी, चाटूगिरी…राज ठाकरेंचा शिंदेंवर पहिल्याच ‘वार’
Raj Thackeray मला स्वत: ला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, बरं हे पंतप्रधानांना माहित नसेल खाली किती चाटुगिरी चालू असेल ?
Raj Thackeray On Eknath Shinde मतदार याद्यांच्या घोळाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झालेत. मतदारयाद्यांच्या घोळाबाबत, इव्हीएम मशीनमधील फिक्सिंगबाबत मनसेकडून सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त यांच्यावर टीका केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वीच पहिला वार केला आहे.
मॅच तर फिक्स झालीय..
राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातील मतदार याद्यांबाबत भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, मतदार याद्या स्वच्छ करा आहे. आणखी एका वर्षाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या, काय फरक पडतो. मतदार याद्या स्वच्छ होतील, तेव्हा ज्याचा पराभव होईल, त्याचा विजय होईल ते आम्हाला मान्य आहे. सगळ्या गोष्टी लपवून निवडणूक घ्यायचा. मग मॅच तर फिक्स आहे. (Eknath Shinde On Raj Thackeray MNS office bearers at the gathering)
पुण्याच्या लेकीने घडवला इतिहास! डायना पुंडोले ठरणार फेरारी रेस करणारी पहिली भारतीय महिला
एकनाथ शिंदेंचा जोरदार समाचार घेतला
राज ठाकरे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. किती स्वाभिमान गहाण टाकायचा, याला काही मर्यादा आहे का ? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त टूरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रात टुरिझम केंद्र काढत आहे. नमो टुरिझम सेंटर काढत आहे. ही नमो टुरिझम सेंटर कुठे काढतायत शिवनेरीवर, राजगडावर, रायगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजाचं नाव असावे, तेथे टूरिझमचे सेंटर काढायला निघाले आहेत. मी आताच सांगतो, सत्ता असो नसो. वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही. सेंटर उभं केलं, तर फोडून टाकणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.
मोठी बातमी ! पवईतील स्टुडिओमध्ये मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर
मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची
मला स्वत: ला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, बरं हे पंतप्रधानांना माहित नसेल खाली किती चाटुगिरी चालू असेल ? इतपर्यंत हे कशातून येतो सत्ता डोक्यातून गेली की आम्हाला वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो नाही काही असो मला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिले. मला सत्ता मिळाली पाहिजे. जे समोर दिसेल ते मला मिळाले पाहिजे. ज्याला खूश करायचे आहे ते करू. मुंबईतील जागा अदानीला द्यायच्या देऊन टाका. तो बोट ठेवेल ती जागा देवून टाकायची. म्हणून तुम्हाला बारीक लक्षं ठेवावे लागेल. त्यासाठी एक तारखेला मोर्चा काढायचा आहे. दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीला कळू द्या महाराष्ट्रात काय आग लागली आहे ? असे राज ठाकरे म्हणाले.
