मोठी बातमी ! पवईतील स्टुडिओमध्ये मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर
rohit arya : मुलांची सुटका करताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला.
RA Studio building in Powai:RA Studio building in Powai rohit arya death:मुंबईतील पवई भागातील आर स्टुडिओमध्ये मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्या (Rohit Arya) याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. मुलांची सुटका करताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला. त्यात रोहित आर्या हा जखमी झाला होता. मुंबईतील पवई भागातील आर स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी ही थरारक घटना घडलीय.
स्टुडिओमध्ये आलेल्या मुलांना कोंडून टाकण्यात आले. त्यानंतर स्टुडिओ जाळून टाकण्याची धमकी रोहित आर्याने दिली होती. परंतु पोलिस मुलांना वाचविण्यासाठी आल्यानंतर रोहित आर्याने गोळीबार सुरू केला. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी रोहित आर्यावर फायरिंग केली. त्यात त्याला दोन गोळा लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारेंकडून एन्काऊंटर
सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे हे मुलांची सुटका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहित आर्याने आपल्याकडील पिस्तूलमधून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. त्यात रोहित आर्याचा मृत्यू झाला.
ब्रेकिंग : जैन बोर्डिंगच्या वादाचा अंक संपला; ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधील व्यवहार अखेर रद्द
रोहित आर्याला मुलांचा घात करायचा होता
रोहित आर्याने ऑडिशनसाठी मुलांना आर स्टुडिओमध्ये बोलविले. त्यानंतर एका रुममध्ये मुलांना डांबून ठेवले. त्याने व्हिडिओ जारी करून काही मागण्या केल्या होत्या. त्याच्याजवळ काही केमिकल होते. ते केमिकल वापरून त्याला मुलांना जाळून टाकायचे होते.
रोहित आर्याकडून व्हिडिओ
रोहित आर्याने एक व्हिडिओ व्हायरल केलाय. सुसाइट करण्यासाठी मी एक प्लॅन बनविला आहे. मी मुलांना ओलिस ठेवले आहे. माझ्या मागण्या कमी आहेत. माझे काही प्रश्न आहेत. मला काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यांचे काही उत्तर हवे आहेत. मी दहशतवादी नाही. माझी पैशांची मागणी नाही. मला काही संवाद साधायचा आहे. त्यासाठी मी मुलांना ओलीस ठेवले आहे. एका प्लॅन ठरविला होता. मी जिवंत राहिले तर मी करणार आहे. त्याचा संवादानुसार त्याला मुलांना जाळून टाकायचे होते.
रोहित आर्या कोण होता ?
रोहित आर्या हा मूळचा पुण्यातील आहे. तो काही दिवसांपासून मुंबईत राहत होता. मुंबईतील पवई परिसरात एक्टिंग क्लासेस आणि ऑडिशनसंदर्भात तो काम करत होता. तो अप्यरा नावाने युट्यूब चॅनेलही चालवत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. दीपक केसरकर मंत्री असतानाच्या काळात त्याला शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठी टेंडर मिळाले होते. त्यातील काही पैसे आर्याला मिळाले होते. तर सुमारे 45 लाख रुपये त्याला मिळाले नव्हते. त्यासाठी त्याने आंदोलनही केले होते. तर केसरकर यांनी त्याला पैसे दिले होते, असा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलाय.
