Rohit Arya : मंत्री केसरकरांविरोधात महिनाभर उपोषण करणाऱ्या तरुणाला रस्त्यावरच आली फिट…
Rohit Arya : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या विरोधात गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या तरुणाला अचानक फिट आली. फिट आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित आर्या Rohit Arya) असं या तरुणाचे नाव आहे.
WhatsApp कॉल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता कॉलिंगसाठी होणार मोठा बदल
रोहित आर्या या तरुणाने ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हा प्रकल्पाचे डिझाईन तयार केल्याचा दावा केला होता. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सूरज लोखंडे आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित होते.
मला अडवण्याचे प्रयत्न सुरू
3 ऑगस्टच्या रात्री दीपक केसरकर यांनी घरी येऊन माझ्या अपेक्षा जाणल्या, चुकीचं नसल्याचे सांगितले आणि सोमवारी (5 ऑगस्ट) ला सर्व ठीक करण्याचं आश्वासन देत मला उपोषण सोडायला सांगितलं. त्यांचा मी मान राखला. 7 ऑगस्टला मंत्री महोदयांचे आश्वासन पोकळ असल्याचे उघड झालं. 9 ऑगस्ट रोजी मी पुन्हा मंत्री महोदयांची भेट घेतली तेव्हा त्यांनी परत व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव महाजन यांनी माझ्याकडून चूक झाली असून त्याची चौकशी झाल्याशिवाय काहीही करता येणार नसल्याचे सांगितले. माझ्याबद्दल अनेक खोट्या गोष्टी बोलल्या जात होत्याच, आता मला अडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला काहीही झाले तरी कोणतेही उपचार करू नये. मझ्या काही अपेक्षा आहेत, पूर्ण झाल्याशिवाय मला उपोषण सोडायचे नाही, असे उपोषणावरील तरुणाने म्हटलं.
तरुणाने सांगितले की फिल्म लेट्स चेंजच्या आधारावर या अभियानाची संकल्पना करून 2022 पासून पीएलसी स्वच्छता मॉनिटर्स राबवत आहे. माझी संकल्पना आणि मी घेतलेले फिल्म राईट्स् वापरले गेले. परंतु माझ्याकडून पूर्ण काम करून घेतल्यानंतर मी कुठेच नव्हतो. सरकार आपल्या चुका सुधारणार का? मीडियाने दखल घेऊन लोक जागे होतील का? असा सवाल त्यांनी केला.
Video : मोठी बातमी! MIM च्या पत्रकार परिषदेमध्ये राडा; पहा व्हिडिओ
मी आत्महत्या तर त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, त्यांचे PS मंगेश शिंदे, आयुक्त सूरज मांढरे, समीर सावंत, तुषार महाजन हे जबाबदार असतील, असं या तरुणाने म्हटले आहे.
आंदोलन करून एक महिना झाला. मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं. मात्र, त्यांनी काहीच केलं नाही. मी केलेला प्रकल्प केसरकर साहेबांना आवडला होता आणि त्यांनी माझी शाळा सुंदर शाळामध्ये तो घेतला होता. 2 कोटी रुपये मंजूर केले, पण यानंतर त्यांनी पैसे दिले नाही, नावही दिलं नाही, असा आरोप या तरूणाने केला.