एन्काऊंटर झालेला रोहित आर्या काही दिवस आधी मराठी कलाकारांना भेटला, काय आहे कारण अन् कलाकार कोण?

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्या याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता नवनवीन आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 10 31T174249.882

मुंबईतील पवईल्या आर. ए. स्टुडिओमध्ये शॉर्टफिल्मच्या ऑडिशनसाठी (Film) बोलावून 17 अल्पवयीन मुलांना या स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवलं होतं. पोलिसांनी वॉशरुममधून प्रवेश करून 17 मुलांसह एकूण 19 जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्या याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता नवनवीन आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ज्या स्टुडिओमध्ये रोहित आर्या ऑडिशन घेत होता, त्या स्टुडिओला मराठी कलाविश्वातील काही नामवंत कलाकारांनी भेट दिल्याचं कळतंय. जेष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेसुद्धा आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्याला भेटल्याचं आणि ऑडिशन सुरू असलेल्या मुलांशी संवाद साधल्याचं समजतंय. विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी ते स्टुडिओमध्ये गेल्याचं कळतंय.

मला पाच लिटर पेट्रोल आणायला सांगितलं आणि, अभिनेता रोहित आर्याबद्दल साक्षीदाराचे धक्कादायक खुलासे

पोलिस चकमकीत मारला गेलेला रोहित आर्या हा नागपूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षक होता. तो मनोरुग्ण असल्याचंही सांगण्यात येत आहे. मुलांना ओलिस ठेवण्याचा प्लॅन अंमलात आणण्यापूर्वी त्याने बरीच तयारी केली होती. रोहितने शॉर्टफिल्मसाठी 800 बालकलाकारांचे व्हिडिओ मागून घेतले आणि त्यातील 80 निवडले. त्यानंतर 35, 20 आणि अखेर 17 बालकलाकारांचा त्याने चार दिवसांचा वर्कशॉप घेतला.

रोहितला मुलांच्या अपहरणावर एक हॉरर चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी काहींच्या पालकांचेही त्याने ऑडिशन्स घेतले. घटना घडायच्या आधी त्यांनी प्रत्यक्ष चित्रपटाच्या अनुषंगाने अभिनय केला. नंतर रोहिकने पालकांना आणि मुलांना सीन क्रिएट करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याने 17 मुलांना डांबून ठेवलं. पण हा शूटिंगचाच भाग असल्यामुळे आम्हाला कुणालाही शंका आली नाही, अशी माहिती एका पालकाने दिली.

मुलांना ओलीस ठेवल्याचा व्हिडीओ तयार करून रोहित आर्याने तो त्यांच्या पालकांना पाठवला होता. “मी दहशतवादी नाही, माझी पैशांची मागणी नाही. मला फक्त संवाद साधायचा आहे. मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्यासाठी मी हे सर्व करतोय”, असं त्याने या व्हिडीओत म्हटलं होतं. दरम्यान, या चार दिवसांच्या काळात मीनल कपूर, स्वप्निल जोशी, तेजश्री प्रधान, अंकुश जोशी हे कलाकार स्टुडिओत येऊन गेल्याचंही कळतंय. डिसेंबर महिन्यात रोहितने 14 दिवसांच्या शूटिंगचा प्लॅन केला होता.

follow us