मला पाच लिटर पेट्रोल आणायला सांगितलं आणि….अभिनेता रोहित आर्याबद्दल साक्षीदाराचे धक्कादायक खुलासे

रोहित आर्याने मला पाच लिटर पेट्रोल आणि दिवाळीचे फटाके आणायला सांगितले. फटाके शूटचा भाग असल्याने मी ते आणले, पण पेट्रोल नेलं नाही.

  • Written By: Published:
News Photo   2025 10 31T162718.971

मुंबईतील पवई परिसरातील आर. के. स्टुडिओमध्ये घडलेलं ओलीस नाट्य अजूनही सर्वांच्या चर्चेत आहे. (Mumbai) अभिनेता रोहित आर्या याने 17 मुलं आणि दोन प्रौढ नागरिकांना ओलीस ठेवलं. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याचा एन्काऊंटर केला. मात्र, या प्रकरणाचा साक्षीदार रोहन आहेरने धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आआहेत.

रोहित आर्याने मला पाच लिटर पेट्रोल आणि दिवाळीचे फटाके आणायला सांगितले. फटाके शूटचा भाग असल्याने मी ते आणले, पण पेट्रोल नेलं नाही. मी स्टुडिओत पोहोचलो तेव्हा त्याने कुणालाही आत येऊ दिलं नाही. त्याने आग दाखवायची असल्याचा बहाणा केला, पण खरी योजना काहीतरी वेगळीच होती असं या प्रकरणातील साक्षीदार रोहन आहेर म्हणाला आहे. रोहनच्या म्हणण्यानुसार, रोहित आर्याने संपूर्ण मास्टरप्लॅन आधीच आखला होता.

मोठी बातमी ! पवईतील स्टुडिओमध्ये मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर 

त्याचबरोबर ऑडिशन घेताना त्याने प्रोजेक्ट मॅनेजरला सांगितलं होतं की शूटदरम्यान किडनॅपिंगचा सीन करायचा आहे. त्याने Justdial वरून आर.के. स्टुडिओ बुक केला आणि आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. एवढंच नाही, त्यांचा एक्सेस स्वतःच्या फोनमध्ये घेतला होता, रोहितने स्टुडिओमध्ये पेट्रोल, रबर सोल्यूशनसारखे ज्वलनशील पदार्थ आणून ठेवले होते. चार मुलांना एका खोलीत डांबलं आणि त्यांच्या समोर कपड्यावर रबर सोल्यूशन ओतून लायटर पेटवण्याची धमकी दिली. मी मदतीसाठी पुढे गेलो तर तो ओरडला पुढं आलास तर मुलांना पेटवून देईन असा धक्कादायक खुलासाही रोहनने केला आहे.

संशयास्पद हालचाली पाहून रोहनने पालकांना अलर्ट केलं आणि पोलिसांना बोलावण्यास सांगितलं. पोलिसांचे ऑपरेशन सुरू असताना रोहनने मुलांना बाहेर काढण्यात मदत केली, ज्यात तो स्वतः काच लागून जखमी झाला.रोहितने स्टुडिओ एक दिवसासाठी जास्त बुक केला होता. याच दिवशी त्याने आपला प्लॅन अंमलात आणला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला नसता, तर ही दुर्घटना आणखी भयावह ठरली असती.

follow us