Mumbai Monorail : मुंबईत भरपावसात मोनोरेल पडली बंद; फायर ब्रिगेडने केली प्रवाशांची सुटका
मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका केली.

Mumbai Monorail : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असताना मोनोरेल पुन्हा एकदा बंद पडली. वडाळा भागात आज सकाळी मोनोरेल अचानक थांबल्याने प्रवासी अडकले. ही घटना होताच फायरब्रिगेडला पाचारण करण्यात आलं. जवानांनी तत्परतेने अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. यंदाच्या पावसाळ्यात मोनोरेल थांबण्याची ही दुसरी वेळ आहे. सकाळच्या ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. प्राथमिक माहितीनुसार, मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. मोनोरेलचा ट्रॅक उंचावर असल्याने प्रवाशांना बाहेर काढणं हे आव्हानात्मक ठरतं. अशावेळी अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनसाठी बोलवावं लागतं.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणी (Mumbai Monorail) साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. बस उशिराने धावत आहेत. लोकलही लेट झाल्या आहेत. मध्य रेल्वेची लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल पाच ते दहा मिनिटे (Mumbai Rains) उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक बिघडले आहे.
#WATCH | Maharashtra: A monorail comes to a halt in the Wadala area of Mumbai due to technical glitches. Details awaited. pic.twitter.com/XQMnINKkFx
— ANI (@ANI) September 15, 2025
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी मोनोरेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, आज या रेल्वेत तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे रेल्वे बंद पडली. ऑफीसला निघालेल्या लोकांचे हाल झाले. काही दिवसांपूर्वीही अशाच पद्धतीने रेल्वे बंद पडली होती. आत प्रवासी अडकले. त्यावेळी रेल्वेच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते. आताही रेल्वे बंद पडली. यामागे काय कारण आहे याचा शोध घेतला जात आहे. विद्यूत पुरवठा किंवा यांत्रिक समस्या उद्भवल्याने रेल्वे बंद पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पु्ण्यात तुफान पाऊस! घरे अन् वाहने पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर; सतर्कतेचे आवाहन
प्रशासनाच्या नागरिकांना सूचना
नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.