पु्ण्यात तुफान पाऊस! घरे अन् वाहने पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर; सतर्कतेचे आवाहन

पुण्यात या पावसाने कहर केला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत.

Pune Rains

Pune Rain News : मान्सूनचा परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालत आहे. मुंबई पु्ण्यासह सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आजही पावसाचा मुक्काम आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात या पावसाने कहर केला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत. पावसाची परिस्थिती पाहता आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हडपसर, लोणी काळभोर या भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे या भागातील रस्ते पाण्याखाली गेले. इतकेच नाही तर लोकांच्या घरात पाणी शिरले. वाहने देखील अर्ध्यापर्यंत पाण्याखाली गेली आहेत. पुण्यात आजही अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

पावसाचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाची सर्वदूर हजेरी; आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

शाळांना सुट्टी जाहीर 

चिंचवड परिसरात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोहगांव, हडपसर, हवेली, शिवाजीनगर, मगरपट्टा, कोथरूड भागात जोरदार पाऊस पडला. मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सध्याची स्थिती शाळा प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली आहे. काही ठिकाणी झाडे पडली आहेत. रस्त्यावर पाणी साचले आहे. हडपसर भागात बहुतांश शाळांना सुट्टी दिली आहे. पुण्यातही काही भागातील शाळा आज बंदच राहणार आहेत.

प्रशासनाच्या नागरिकांना सूचना

नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.

सावधान! पुढील 72 तासांत अतिमुसळधार कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी

follow us