सावधान! पुढील 72 तासांत अतिमुसळधार कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांत सातारा आणि सांगलीत मुसळधार पाऊस होईल.

Maharashtra Monsoon

Maharashtra Rain Forecast : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आजही काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटास पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांत सातारा आणि सांगलीत मुसळधार पाऊस होईल. पुणे जिल्ह्यात तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. अहिल्यानगर शहरात सायंकाळच्या (Maharashtra Rain) वेळी तुफान पाऊस झाला. आणखीही काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोलापूरमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर! दिल्ली, पंजाब, जम्मूमध्ये पूरस्थिती; यमुना नदी धोक्याच्या पातळीवर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube