उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर! दिल्ली, पंजाब, जम्मूमध्ये पूरस्थिती; यमुना नदी धोक्याच्या पातळीवर

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर! दिल्ली, पंजाब, जम्मूमध्ये पूरस्थिती; यमुना नदी धोक्याच्या पातळीवर

Heavy Rain In North India : उत्तर भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमधील भाक्रा धरणाची पातळी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतलज नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दिल्लीतील परिस्थिती

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या (North India) सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यातच यमुना नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून जुन्या रेल्वे पुलाजवळ ती 207.47 मीटरपर्यंत पोहोचली (Heavy Rain) आहे. गोकुळ बॅरेजमधून सोडण्यात येणाऱ्या लाखो क्युसेक पाण्यामुळे आणि (Flood In Delhi) मथुरा-आग्रा परिसरातील पावसामुळे यमुना ओसंडून वाहते आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे ( Yamuna River Danger Level) परिसरातील घरे, मदत शिबिरे आणि झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत.

मुसळधार पाऊस, बचावकार्य सुरू

बुधवारी आग्र्यात या हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला. सलग तीन दिवसांच्या पावसामुळे शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि कॉलन्या पाण्याखाली आल्या आहेत. वाहतूक व्यवस्था कोलमडली असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. काही ठिकाणी बोटींचा वापर करून तर काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाण्यातून मदत पोहोचवण्यात आली. यमुना बाजार, मयूर विहार फेज-१ आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना आपली घरं सोडून सरकारी शाळांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.

पुढील हवामानाचा अंदाज

हवामान खात्याने येत्या शुक्रवारी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक महामार्ग व मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं असून जनजीवन ठप्प झालं आहे. सुलतानगंज कल्व्हर्ट, शंकरगड कल्व्हर्ट, राम नगर, मानस नगर, साकेत कॉलनी, आवास विकास, लोहा मंडी, कमला नगर, एमजी रोड परिसरासह अनेक भागात जलसंचय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube