Brazil Flood : ब्राझीलमध्ये पूर अन् पावसाचे थैमान; 57 लोकांचा मृत्यू, हजारो बेघर

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पूर अन् पावसाचे थैमान; 57 लोकांचा मृत्यू, हजारो बेघर

Brazil Flood : दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशात सध्या पाऊस आणि (Brazil Flood) पुराने हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला (Heavy Rain in Brazil) आहे. या पुरामुळे कमीत कमी 56 लोकांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. या नैसर्गिक संकटातून नागरिकांना वाचविण्यासाठी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहेत. घरे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या येत आहे. ब्राझीलमधील सुरक्षा यंत्रणांनी माहिती दिली, की रियो ग्रांडे डो सूल या राज्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे येखील पुलांवर दबाव वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत पोर्टो एलेग्रे या मोठ्या शहराला धोका निर्माण झाला आहे.

विमान उड्डाणे रद्द, ऑफिस बंद, बससेवाही ठप्प; दुबईत पुन्हा पावसाची दहशत, नवा अंदाज काय?

गव्हर्नर एडुआर्डो लेइट यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे. या संकटात मदतकार्य अतिशय वेगाने सुरू आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांनी मदतकार्य सुरू ठेवण्याचे आणि संकटग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

हवामान विभागाने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी बिघडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. येथील मुख्य नदी गुइबातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याचं संकट आणखी वाढेल. या भागातील अनेक गावे आणि शहरांचा संपर्क तुटला आहे. सातत्याने पाऊस होत असल्याने मुलभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. घरांची पडझड झाली आहे. विजेचे खांब कोसळले आहेत. झाडेही उन्मळून पडली आहेत. सगळीकडे पुराचे पाणी पसरले आहे. लोकांच्या घरात पाणीच पाणी साचले आहे. सध्याची परिस्थिती पाहता नदीजवळ आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना येथील स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत.

Weather Update : सावधान! पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube