विमान उड्डाणे रद्द, ऑफिस बंद, बससेवाही ठप्प; दुबईत पुन्हा पावसाची दहशत, नवा अंदाज काय?

विमान उड्डाणे रद्द, ऑफिस बंद, बससेवाही ठप्प; दुबईत पुन्हा पावसाची दहशत, नवा अंदाज काय?

Dubai Rains Today : संयुक्त अराब अमिरातमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस (Dubai Rains Today) आणि वादळामुळे लोकांचे टेन्शन वाढले आहे. गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह तुफान पाऊस कोसळला. त्यामुळे येथील प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. तसेच विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बससेवेवरही परिणाम झाला आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कंपन्यांनी आपल्या (UAE Heavy Rain) कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम करण्याची मुभा द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्व भागात सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उद्याने आणि समुद्र किनारे बंद करण्यात आले आहेत. तत्काळ प्रभावाने अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. रस्त्यांवरील वाहतुकही बंद केली आहे.

पावसाच्या हाहाकाराने दुबईची झाली ‘डुबई’ गाड्या वाहून गेल्या; दुकाने, रस्ते, विमानतळही पाण्यात

हवामान विभागाने सांगितले की गुरुवारी मध्यरात्रीपासून युएईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दुबईत गुरुवारी पहाटे अडीच वाजता पाऊस आण विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर येथे पुढील दोन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दुबईला येणारी पाच उड्डाणे वळवण्यात आली तर अन्य तेरा उड्डाणे रद्द करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईतील नागरिक गुरुवारी जोरदार वारा आणि गडगडाटाने जागे झाले. आता येत्या 3 मे पर्यंत देशात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. अहवालानुसार अबुधाबी शहराच्या काही भागातील रस्त्यावर पाणी साचले होते.

दुबईत कशामुळे झाला इतका पाऊस? कृत्रिम पाऊस की दुसरे काही

दरम्यान, मागील महिन्यात दुबई विमानतळ परिसरात 12 तासांत सुमारे 100 मिमी पावसाची नोंद झाली होती. 24 तासांत एकूण 160 मिमी पाऊस पडला. दुबईतील या पावसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. युएई हा एक तेलसमृद्ध देश आहे. याठिकाणी इतका मुसळधार पाऊस होईल याची शक्यता नव्हती. परंतु, बदलत्या हवामानाचा फटका या देशालाही बसला. युएईप्रमाणेच ओमान देशातही पावसाने कहर केला होता. येथे पावसामुळे 18 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच बहारीनमध्येही पावसाचा तडाखा बसला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube