पावसाच्या हाहाकाराने दुबईची झाली ‘डुबई’; गाड्या वाहून गेल्या; दुकाने, रस्ते, विमानतळही पाण्यात

पावसाच्या हाहाकाराने दुबईची झाली ‘डुबई’; गाड्या वाहून गेल्या; दुकाने, रस्ते, विमानतळही पाण्यात

Dubai Rain Updates : संयुक्त अरब अमिरात देशाची राजधानी दुबईत पावसाने अक्षरशः हाहाकार (Dubai Rain Updates) उडाला आहे. शहरात महापुरासारखी परिस्थिती निर्मााण झाली आहे. लोकांची घरे आणि मॉल्समध्ये पाणी शिरले आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने नागरिक भयभीत झाले आहेत. सोमवारी रात्रभर आणि मंगळवार सकाळपर्यंत पावसाने शहराला झोडपून काढले. तर दुसरीकडे ओमान देशात मुसळधार पावसामुळे 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुबई शहर तर जलमय झाले आहे. शहरातील विमानतळ, मेट्रो स्टेशनसह रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शेकडो इमारतीत पाणी शिरले आहे. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा रनवे देखील पाण्याखाली गेला आहे. याचा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. सध्याची पूरस्थिती पाहता येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Train Derail : साबरमती-आग्रा सुपरफास्टची मालगाडीला धडक, 4 डब्बे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरू

खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दुबई, अबुधाबी आणि शारजाह या शहरांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभरात या शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. फक्त पाऊसच नाही तर गारपीट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पूरस्थिती उद्भवेल अशा ठिकाणी राहू नये, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विमान उड्डाणे रद्द, रेल्वे स्टेशनमध्येही पाणीच पाणी

मुसळधार पावसामुळे दुबई विमानतळावर येणारी विमाने पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहेत. येथील 50 पेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. या पावसाचा फटका शहरातील मेट्रो रेल्वे सेवेलाही बसला आहे. मेट्रो स्टेशन परिसरात गुडघ्याइतके पाणी साचले आहे. दुबई ते अबुधाबी, दु्बई ते शारजाह आणि दुबई ते अजमान दरम्यान बससेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख शॉपिंग सेंटर आणि मॉल ऑफ एमिरेट्समध्येही पाणी भरले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक लोक मॉलमध्ये अडकून पडले आहेत. बस आणि रेल्वेसेवा पुन्हा कधी सुरू होतील याची माहिती अद्याप नाही.

मंगळवारी दुपारी दुबई विमानतळ परिसरात 12 तासांत सुमारे 100 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत एकूण 160 मिमी पाऊस पडला. दुबईत सुरू असलेल्या या पावसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. युएई हा एक तेलसमृद्ध देश आहे. याठिकाणी इतका मुसळधार पाऊस होईल याची शक्यता नाही. परंतु, बदलत्या हवामानाचा फटका या देशालाही बसला आहे. युएईप्रमाणेच ओमान देशातही पावसाने कहर केला आहे. येथे पावसामुळे 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बहारीनमध्येही पावसाचा तडाखा बसला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज