दुबईत CBSE चं कार्यालय उघडणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

दुबईत CBSE चं कार्यालय उघडणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

CBSE Office in Dubai : दुबईतही CBSE चं कार्यालय उघडणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केली आहे. दुबईतील अबुधाबमध्ये आज दुबईस्थित भारतीयांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं आहे. दुबईत जागतिक समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत भाष्य केलं आहे.

Aditya Narayan Controversy: आदित्यने खरंच चाहत्याला मारलं? अखेर सत्य आलं समोर

पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्या अडीच लाखांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी दुबईच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी दुबईत सीबीएसईचे कार्यालया उघडण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात आयआयटी दिल्ली कॅम्पसमध्ये पीजी कोर्स सुरू करण्यात आला होता. आता मोदींच्या घोषणेनंतर दुबईमध्ये लवकरच सीबीएसईचे नवीन कार्यालय सुरू होणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी या संस्था उपयुक्त ठरणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.

‘अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?’ ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल

1.5 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी UAE च्या शाळांमध्ये शिकत आहेत. गेल्या महिन्यात आयआयटी दिल्ली कॅम्पसमध्ये येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता आणि लवकरच दुबईमध्ये सीबीएसईचे नवीन कार्यालय सुरू केले जाईल. या संस्था येथील भारतीय समुदायाला चांगले शिक्षण देणार आहेत. आज अबुधाबीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. तुम्ही सर्व UAE च्या कानाकोपऱ्यातून आणि भारताच्या विविध राज्यांमधून इथे आला आहात. पण प्रत्येकाची मने एकमेकांशी जोडलेली असल्याचं मोदी म्हणाले आहेत.

‘लग्न कल्लोळ’मधलं थिरकायला लावणारं ‘झणझणल्या काळजावर’ गाणं प्रदर्शित

दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान मोदी सातव्यांदा यूएईला पोहोचले. मोदी युएईत दाखल होताच त्यांच्या मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध मुद्द्यांवर मोदी सविस्तर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी शेख मोहम्मद बिन झायेद यांनाही भाऊ म्हणून संबोधले आहे. युएईत आल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखे वाटत असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज