‘अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?’ ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल

‘अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?’ ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल

Uddhav Thackeray Group Criticized Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) काल अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्याने काँग्रेसची साथ सोडली. याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार आहे. या राजकीय घडामोडीवर काल दिवसभर प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिटकवण्याचे काम फडणवीस-मोदी यांना करावं लागतंय. भाजपाच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे. शहीद भाजपला कधीच माफ करणार नाहीत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

आता भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, असे वातावरण फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात झालं आहे. अब की बार चारसौ पार ही मोदींची गर्जनाही याच मोहिमेचा भाग आहे. अन्य पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन ते दोनशेचा आकडा पार करू शकतील अशी परिस्थिती आहे. यामुळे घाबरलेला भाजप रोज दुसऱ्या पक्षांतील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करत आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते माजी मु्ख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

धारावीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मोडमध्ये; ऑफिस तुमचं असलं तरी रस्ते आमचे

अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काँग्रेसने काय द्यायचे कमी केले होते, असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे. त्यांचे वडिल शंकरराव चव्हाण राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. त्याआधी वर्षानुवर्षे मंत्री होते. केंद्रात अर्थ, संरक्षण, गृह अशी खाती सांभाळली. त्यानंतर अशोक चव्हाण सुद्धा दीर्घ काळ मंत्री आणि मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या रक्तात काँग्रेस होती तरीही ते भाजपात गेले अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मुंबईतील कफ परेड भागात शहीद सैनिकांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर अशो चव्हाण यांच्या प्रेरणेने टॉवर उभा राहिला. खरी इमारत पाच ते सहा मजल्यांचीच होणार होते. पण, अशोक चव्हाण यांच्या कृपेने 32 मजल्यांची झाली. कोट्यावधींचा व्यवहार झाला. पुढे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. त्यात अनेक अधिकाऱ्यांना अटक झाली. राजकारणी मंडळींनीही या इमारतीत गुंतवणूक केली होती. या इमारतीत अशोक चव्हाण अँड फॅमिलीचे पाच ते सहा फ्लॅट असल्याचे नंतर उघड झाले. शहिदांच्या विधवा पत्नींचे फ्लॅट्स हडपण्याचे प्रकरण तेव्हा भाजपाने चांगलेच लावून धरले होते.

अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?

या प्रकरणात अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नांदेडात येऊन अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्यात शहिदांचा अपमान केला असे सांगितले होते. आदर्श गृहनिर्माण सोसायटीतील कारगिल शहिदांच्या विधवा पत्नींच्या फ्लॅट्सची ज्यांनी चोरी केली, हे फ्लॅट्स ज्यांनी आपली सासू, मेव्हणी यांच्या नावावर करून घेतले ते अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील, असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Ashok Chavhan यांच्या प्रवेशाबाबत फडणवीसांचे संकेत पण बावनकुळेंकडे प्रस्ताव नाही; गौडबंगाल काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज