धारावीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मोडमध्ये; ऑफिस तुमचं असलं तरी रस्ते आमचे

  • Written By: Published:
धारावीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मोडमध्ये; ऑफिस तुमचं असलं तरी रस्ते आमचे

मुंबई : धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग (Adani Group) समूहाला देण्याच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने अदानींच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. विकासाच्या नावाखाली सर्वकाही अदानींच्या घशात घालू देणार नाही. कदाचित सरकारकडे कागद पेन आणि ऑफिस असेल पण तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात असल्याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली. त्यांच्या या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बाळासाहेबांच्या मोडमध्ये जात रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे. (Uddhav Thackeray On Dharavi Development)

स्वतःच्या स्वार्थासाठी पवारांनी खेळी केली; मराठा आरक्षणाचा इतिहास सांगत फडणवीसांचं मोठं विधान

काय म्हणाले ठाकरे?

आज केवळ मुंबईचं रस्त्यावर उतरली आहे. वेळ पडली तर, संपूर्ण महाराष्ट्र धारावीत पोहोचवेन. ज्यांनी अदानींची सुपारी घेतली त्यांनी हा अडकित्ता लक्षात ठेवावा असं म्हणत याच अडकित्त्याने तुमची दलाली चेचून चेचून टाकू जेणे करून तुम्ही पुन्हा अदानीचे नाव घेणार नाही. 50 खोके कमी पडले म्हणून या बोक्यांची नजर आता धारावीकडे वळली असल्याचा दावाही ठाकरेंनी यावेळी केला. हे सरकार आपल्या दारी नाही तर, अदानीच्या दारी असल्याचं ठाकरे म्हणाले. आज माझ्यासोबत सर्व पक्ष एकवटले असून, मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पहिल्यांदा शिवसैनिक धावतो असेही ठाकरे म्हणाले.

स्थानिकांसाठी बाळासाहेबांनी भरला होता सज्जड दम

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी माणूस गिरणी कामगार म्हणून काम करत होता. तर, एअर इंडिया, पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया, बँका याठिकाणी टायपोग्राफर, स्टेनो म्हणून दाक्षिणात्य मंडळी काम करत असत. मराठी माणसाला व्हाईट कॉलर जॉब मिळायला हवेत अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी आंदोलनेदेखील केले होते.

‘अण्णा, तुमचं आंदोलन आम्हाला परवडणार नाही’; CM शिंदेंचा फोन, अण्णांचीही हसून दाद

मराठी मुलांना एअर इंडियात नोकरी मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावेळी बाळासाहेबांनी आंदोलन करत थेट एअर इंडियाच्या ऑफिसला धडक दिली होती. राज्यातील एअर इंडियातील नोकऱ्यांमध्ये सर्वात पहिला हक्का येथील स्थानिक मुलांचा असला पाहिजे असे ठाकरेंचं ठाम मत होतं. मात्र, केंद्राच्या पॉलीसीमुळे असे होऊ शकत नसल्याचे सांगत मला नियमांनी चालावं लागेल असं उत्तर त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने बाळासाहेबांना दिले होते.

त्यावर बाळासाहेबांनी तुमची विमानं ज्या हवेतून उडतात ती हवा भलेही तुमही असू शकते. मात्र , ज्या रस्त्यांवरून तुम्ही घरी जाता ते रस्ते माझे आहेत असा सज्जड दम बाळासाहेबांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला भरला होता. काहीवर्षांपूर्वी आलेल्या ठाकरे या मराठी चित्रपटातही हा सीन दाखवण्यात आला होता.

Lokayukta Bill : ठाकरे सरकारला लोकायुक्त कायदा नको होता; अण्णांकडून ठाकरेंवर टीका

त्यानंतर आज धारावी वाजवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी विकासाच्या नावाखाली सर्वकाही अदाणींच्या घशात घालणाऱ्या सरकारला दम भरत कदाचित सरकारकडे कागद पेन आणि ऑफिस असेल पण तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात असल्याचा दम भरला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता उद्धव ठाकरे बाळासाहेबांनी स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी ज्या पद्धतीने रणनीती आखली होती त्याचाच आधार घेत रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज