स्वतःच्या स्वार्थासाठी पवारांनी खेळी केली; मराठा आरक्षणाचा इतिहास सांगत फडणवीसांचं मोठं विधान

  • Written By: Published:
स्वतःच्या स्वार्थासाठी पवारांनी खेळी केली; मराठा आरक्षणाचा इतिहास सांगत फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis Attack On Sharad Pawar Over Maratha Reservation Issue :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप अंतिम तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. मात्र, मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर, तो शरद पवार यांनी केला आहे. स्वतःच्या नेतेपदासाठी पवारांनी दोन समाजांना झुलवतं ठेवलं, असे मोठे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकवून दाखवल्याचेही फडणवीसांना सांगितलं. आपलं सरकार असेपर्यंत ते आरक्षण टिकलं आणि सरकार गेल्यानंतर त्यावर स्थिगिती आली. ते भाजपच्या नागपूर येथील बैठकीत बोलत होते.

‘अण्णा, तुमचं आंदोलन आम्हाला परवडणार नाही’; CM शिंदेंचा फोन, अण्णांचीही हसून दाद

पवारांना समाजाला झुंझवत ठेवण्यात अधिक रस

ते म्हणाले की, राज्यात मराठा आरक्षाच्या मागणीसाठी मोठी आंदोलनं सुरू आहेत. मात्र, इतिहासात डोकाऊन बघितले तर, या आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनीच केला आहे. मविआच्या काळात त्यांना संधी मिळाली होती. मात्र, सुप्रिया सुळे मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असे म्हणून निघून गेल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडळ आयोग लागू झाला त्यावेळी आरक्षण देता आलं असतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांपूर्वी कोण कुठल्या यादीत आहे हे विचारतही नव्हत त्यावेळी आरक्षणाचा तिढा सोडवता आला असता. पण त्यांना आरक्षण द्यायचंच नव्हत तर, समाजाला झुंझवतं ठेवण्यात जास्त रस असल्याची टीका फडणवीसांनी केली. लोकं झुंझत राहिले तर आमच्याकडे मंत्रीपद येईल असे पवारांचे राजकारण राहिले आहे.

मोठी बातमी! इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; अवघ्या चार दिवसात केंद्रानं बदलला निर्णय

आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही 

येत्या काळात मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असून, गेल्या भाजप सरकारच्या काळातही आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते सर्वेच्च न्यायालयात टिकलं देखील होतं. मात्र, भाजप सरकार गेलं आहे आरक्षणही गेलं असे म्हणत, मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का आणि अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीसांनी यावेळी दिली.

मराठा आणि ओबीसी हे समाज आपल्यासाठी केवळ व्होटबँक नाहीत. आपण निवडणुकीच्या निकालाचा विचार करुन कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही. मुळात या मुद्द्याचा निवडणुकीवर फरक पडत नाही. हे समाजाचे प्रश्न आहेत. त्याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नका असा सल्लाही फडणवीसांनी देत मराठा आरक्षणावरुन विरोधकांकडून सुरु असलेल्या प्रचाराविषयी फारशी चिंता करु नका, असा संदेश देत कोणी काही नरेटिव्ह तयार करु द्या, नरेटिव्ह फक्त चार-पाच दिवस चालतं, त्यानंतर त्याची चर्चा बंद होते, असा टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

देशाची सूत्र पुन्हा मोदींंच्या हातात द्यायची आहेत

यावेळी फडणवीसांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवत देशाची सूत्र पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या हातात द्यायची आहेत. मोदी देशाला विकसित करू शकतात असा जनतेला विश्वास आहे. त्यामुळे देशाचं नेतृत्त्व पुन्हा एकदा मोदींकडे देण्याचं जनतेचं मत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube