Maratha Reservation: आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचाय; जरांगेंचे भुजबळांना पुन्हा चँलेज

  • Written By: Published:
Maratha Reservation: आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचाय; जरांगेंचे भुजबळांना पुन्हा चँलेज

वाशिमः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना वाशिममध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी विरोध करत काळे झेंडे दाखविले आहेत. त्यावरून वाशिम येथील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला आहे. जरांगे यांनी भुजबळांचा पुन्हा एकदा एेकरी उल्लेख केला. त्याचबरोबर भुजबळ यांनी जरांगे यांनी उघडपणे धमकी दिली आहे. एखाद्या-दुसऱ्या गावात तुझे माणसे असतील. पण आजूबाजूला माझ्या मराठ्यांचा वेढा आहे. तुला नीट करायला आम्हाला वेळ लागणार नाही. एकदा आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचा आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आणखी वाद उफाळण्याची शक्यता आहे.

चेन्नईतील मिचॉन्ग वादळात 24 तास अडकला आमिर खान, असे झाले रेस्क्यू

जरांगे म्हणाले, छगन भुजबळ सध्या जास्तीचा नाटक करायला लागला आहे. छगन भुजबळ, तुझ्या कार्यकर्त्याला जरी तू सांगत असेल. तुझ्या कार्यकर्त्यांना आमच्याविरोधात आंदोलन करायला लावीत असशील. पण आम्ही सध्या शांत आहे. ते तू लक्षात ठेव. तू जरा सबुरीने घे छगन भुजबळ. मला असे धुडके-फडके दाखवून काही होत नसते. मी काय मंत्री नाही. तू शहाणपणाची भूमिका अजून तरी घे. एखाद्या दुसरा गावात तुझे माणसे असतील. पण आजूबाजूला माझ्या मराठ्यांचा वेढा आहे. तुला नीट करायला आम्हाला वेळ लागणार नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो. अजितदादा, तुमचा माणूस आवरा. वातावरण राज्यातील दुषित करू नका. नाही तर आमच्या नाईलाज होईल. छगन आवरा. आम्ही नादी लागलो तर त्याची खैर करणार नाही.

काँग्रेसचा दारुण पराभव अन् पक्षाच्या नेत्यांचे मंथन सुरुच असतानाच राहुल गांधी परदेश दौऱ्यावर!

आम्हाला वाटतेय या राज्यात शांतता राहिले पाहिजे. तो बोर्ड फाडायला सांगतो. हो कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावतो. मी नुसता गाडीचा खाली उतरलो तरी आमचे पोरं त्यांचा भुगा करतील. मराठा आरक्षणाचा विषय जवळ आलाय म्हणून आम्ही शांतेत घेत आहे. मराठ्यांना तुम्ही लक्षात घ्या 24 डिसेंबरला आरक्षण मिळणार आहे. कोणी कितीही अपमान केला तरी तो पचवा कारण आरक्षण मिळणार आहे. माझा शब्द पाळा. त्याला जातीयतेढ निर्माण करून तेढ करायचा आहे. पण आपल्याला शांतता ठेवायची, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

एकदा आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचा आहे. याने मराठ्याला खेटायचे ठरविले आहे ना. तू पण बघ मग आमच्याकडे काय-काय आहे. दांड्याची-कुऱ्हाडेची भाषा करतोय. पाय तोडण्याची भाषा करतोय. अंबडला येते. कुऱ्हाडीचे भाषा करतो. जातीयतेढ निर्माण करायची भाषा केली जाते. तुला माहित नाही. आमच्याकडे घरात काय काय असते. वातावरण दुषित होऊ देऊ ना. शहाणा असेल शहाणा होय. तर शहाणा राहिले आहे. आता घराघरात मराठा एकत्र आलाय आहे. आम्ही दांडा, कुऱ्हाड हाती घेण्याची करतो. आम्ही तर दांडा हातात घेतला तर तुझा फडशा पाडल्याशिवाय राहणा नाही, असेही जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज