काँग्रेसचा दारुण पराभव अन् पक्षाच्या नेत्यांचे मंथन सुरुच असतानाच राहुल गांधी परदेश दौऱ्यावर!

काँग्रेसचा दारुण पराभव अन् पक्षाच्या नेत्यांचे मंथन सुरुच असतानाच राहुल गांधी परदेश दौऱ्यावर!

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसने (Congress) अनपेक्षितरित्या गमावली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतके मोठे अपयश का आले याचे सध्या चिंतन सुरू आहे. शिवाय दुसऱ्या बाजूला संसदेचे हिवाळी अधिवेशनही सुरू आहे. (Rahul Gandhi will be visiting Indonesia, Singapore, Malaysia and Vietnam from December 9)

मात्र याच दरम्यान, 9 डिसेंबरपासून राहुल गांधी (Rahul Gandhi) इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि व्हिएतनामच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्यासाठी राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा असतानाच ते परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. या तीन नेत्यांमुळेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे, असा दावा केला जात आहे.

लॉरेन्स बिन्शोई गँग मास्टरमाईंड, दुबईत प्लॅन अन् जयपूरमध्ये गेम! सुखदेव सिंहांच्या हत्येची Inside Story

गेहलोत-नाथ-बघेल या त्रिकुटावर काँग्रेस नेतृत्वाला अंधारात ठेवून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीचे चित्र दाखविल्याचा आरोप आहे. तीन डिसेंबरला निकालाचा दिवस साजरा करण्यासाठी दिल्लीच्या बंगाली मार्केटमधून शेकडो किलो लाडूही खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण दुर्दैवाने हा आनंद साजरा करता आलाच नाही. त्यामुळेच खरगे आणि राहुल यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काँग्रेस प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात वेळ वाया घालवू नये, असे पक्षातीन इतर नेत्यांना वाटत आहे.

कमलनाथ यांचे दोन हट्ट पुरविणे अंगलट! ‘इंडिया’ आघाडीला सुरुंग, काँग्रेसचेही वजन घटले!

चार राज्यांच्या निकालात भाजपला बंपर यश :

नुकत्याच जाहीर झालेल्या चार राज्यांच्या निकालात भाजपला बंपर यश मिळाले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही उत्तरेतील महत्वाची राज्ये भाजपने जिंकली आहेत. राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत. तर मध्यप्रदेशमध्ये 164 आणि छत्तीसगडमध्ये 54 जागांवर घवघवीत यश मिळाले आहे. तर तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube