स्टार प्लसच्या आगामी ‘तारा’ मालिकेतील कनिका कपूरने व्यक्त केले ताराचे कंगोरे

Kanika Kapoor : स्टार प्लसने आपल्या आगामी ‘तारा’ या मालिकेची घोषणा केल्यापासून या मालिकेबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता आहे आणि अशातच

Kanika Kapoor

Kanika Kapoor : स्टार प्लसने आपल्या आगामी ‘तारा’ या मालिकेची घोषणा केल्यापासून या मालिकेबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता आहे आणि अशातच निर्मात्यांनी मालिकेचे हटके प्रोमो प्रदर्शित केले असून प्रेक्षक या नव्या मालिकेसाठी आतुर झाले आहेत. या मालिकेत क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत आणि कनिका कपूर ताराच्या भूमिकेत झळकणार आहे. ही कथा दोन वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील व्यक्तींवर आधारित आहे, ज्यांचे एकमेकांशी भावनिक नातं जुळतं आणि पुढे त्या नात्याचं रूपांतर प्रेमात होतं.

ताराची भूमिका साकारणारी कनिका कपूरने या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला आणि ती लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “तारा अखेर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, याचा खूप आनंद आणि उत्सुकता आहे. टेलिव्हिजनमध्ये खऱ्या अर्थाने प्रभाव निर्माण करण्याची ताकद असते. या मालिकेच्या कथेत अनेक अर्थपूर्ण संदेश दडलेला असून त्यामुळे समाजातील वर्गवादाच्या भिंती निखळण्यास नक्कीच मदत होईल, अशी मला आशा आहे. तारा ही भावनिकदृष्ट्या सक्षम असून तिच्या वयापेक्षा ती अधिक समजूतदार आहे. लहानपणापासूनच तिने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत. ती श्रीमंतीत वाढलेली नाही त्यामुळे संघर्षांनीच तिच्या व्यक्तिमत्त्वात जिद्द निर्माण केली आहे. देवावर असलेला तिचा विश्वास तिला कठीण प्रसंगातही पुढे जाण्याची ताकद देतो.”

अभिनेत्रीने युवराजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “तिचं आणि युवराजचं नातं खूप सुंदर आहे कारण ते दोघे जवळजवळ एकत्रच मोठे झाले आहेत. ताराची नानी त्याच्या घरी काम करते त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा पाया हा बालपणातील मैत्रीवर आणि अनेक वर्षांच्या विश्वासावर, आपुलकीवर उभा आहे. जसजसे ते मोठे होतात तसतसे ही मैत्री आणखी खोल नात्यात बदलू लागते. बस्तीमध्ये जन्मलेल्या ताराच्या  प्रवासातून पुढे आयुष्य तिला कुठे घेऊन जाते हे पाहताना प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल आणि कदाचित समाजातील वर्गभेदांच्या भिंतीही तुटायला सुरुवात होईल, अशी मला आशा आहे”

चॅनेलसोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना कनिका सांगते “स्टार प्लससोबतचे माझे नाते जुनेच आहे. याआधी मी स्टार प्लसवरील अभिनयावर आधारित रिॲलिटी शो इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्या शोमुळेच माझ्या अभिनय प्रवासाची खरी सुरुवात झाली.

संतोष देशमुख हत्या प्रकरण, 14 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आरोपी; न्यायालयाने दिला आदेश

तिथे अभिनय प्रशिक्षकांनी मला प्रशिक्षण दिले आणि अभिनयाची कला शिकवली. माझ्या प्रवासाची सुरुवात ज्या व्यासपीठावरून झाली त्या स्टार प्लसबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन” तारा ही सामाजिक भेदांनाही न जुमानता प्रेम आणि आवेशाने पुढे जाणाऱ्या नात्याची हृदयस्पर्शी कथा आहे जी समाजातील भिंतींना आव्हान देणाऱ्या नात्याचे चित्रण करते. ‘तारा’ ही मालिका 10 मार्चपासून दररोज रात्री 8 वाजता फक्त स्टार प्लसवर बघायला विसरू नका!

follow us