अनुपमामध्ये होणार सचिन त्यागींची एंट्री; आपल्या गुंतागुंतीच्या पात्राविषयी व्यक्त केल्या भावना!

नव्या कलाकाराच्या एन्ट्रीबाबत तर्कवितर्क लावले जात होते त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून तो कलाकार सचिन त्यागी असल्याचं कळतंय.

  • Written By: Published:
Untitled Design (41)

Sachin Tyagi to enter Anupama : स्टार प्लसवरील प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची असलेली मालिका म्हणजे अनुपमा ! सध्या या बहुचर्चित मालिकेत मोठा ट्विस्ट आला असून आता टेलिव्हिजन विश्वात चर्चांना उधाण आलं आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्या नव्या कलाकाराच्या एन्ट्रीबाबत तर्कवितर्क लावले जात होते त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून तो कलाकार दुसरा कोणी नसून सचिन त्यागी असल्याचं कळतंय.

नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये त्यांच्या एंट्रीची विशेष झलक दाखवण्यात आली असून तरी त्यांच्या पात्राबद्दलची माहिती मात्र निर्मात्यांनी अजून गुप्त ठेवली आहे त्यामुळे अनुपमा मालिकेच्या कथेत ते काय नवीन घेऊन येणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. टीझरमध्ये केवळ एक झलक दाखवण्यात आली असून यामुळे त्यांच्या आणि अनुपमामधील नात्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते नेमके कोण आहेत? आणि त्यांच्या एंट्री ने काय घडणार मालिका नक्की काय ट्रॅक वर जाणार हे बघण उत्कंठावर्धक ठरतंय.

सचिन त्यागी हे नाव टेलिव्हिजन विश्वासाठी आणि प्रेक्षकांसाठी अजिबात नवीन नाव नाही. यापूर्वी त्यांनी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत मनीष गोयंका ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. कार्तिक गोयंका यांचे सन्माननीय आणि भावनिक स्तर असलेले वडील म्हणून त्यांची भूमिका या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली होती आणि प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून प्रेम आणि प्रशंसा मिळाली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरण, 14 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आरोपी; न्यायालयाने दिला आदेश

अनुपमा या मालिकेतील एंट्रीबद्दल बोलताना सचिन म्हणाले “अनुपमा या मालिकेच्या कलाकारांमध्ये सामील होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 2014 पासून मी ज्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर काम करत आहे तेच हे प्रॉडक्शन हाऊस असल्यामुळे मला अजिबात नवीन ठिकाणी आल्यासारखं वाटत नाही DKP माझं घर आहे माझं कुटुंब आहे. राजनजी/शाही यांची कथाकथनाबद्दलची जिद्द, पात्रांबद्दलचं प्रेम आणि या माध्यमाला ते ज्या पद्धतीने जगतात ते नेहमीच प्रेरणादायी असतं. DKP सोबतचा माझा संबंध आता 12 वर्षांचा झाला आहे आणि अजूनही सुरू आहे”

आपल्या पात्राबद्दल बोलतान सचिन पुढे म्हणाले “तरीही अनुपमामधील हा प्रवास माझ्यासाठी एक नवीन प्रवास आहे आणि मला वाटतं की मालिकेच्या चाहत्यांसाठी ही भूमिका मनोरंजक नक्कीच ठरेल. माझं पात्र खूप गुंतागुंतीचं आहे ज्यात अनेक स्तर आणि वेगवेगळे पैलू आहेत. सध्या मी या भूमिकेबद्दल जास्त बोलू शकत नाही पण इतकं नक्की सांगू शकतो की या पात्रामुळे कथेला एका नवा ट्विस्ट मिळणार यात शंका नाही”

अनुपमामध्ये झालेली सचिन त्यागींची ही खास एंट्री कथानकात मोठा बदल घडवणार का ? हे बघणायसाठी सगळेच आतुर आहेत. कथा उलगडताना नव्या नाट्यमय घडामोड प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचं देखील कळतंय. या दमदार कास्टिंगमुळे अनुपमा पुन्हा एकदा सिद्ध करते की मालिकेतील आश्चर्यकारक वळणं स्टार पॉवर आणि प्रभावी कथाकथन यांचा परिपूर्ण मिलाफ करत ती सतत चर्चेत का राहते. अनुपमा पाहायला विसरू नका येत्या मंगळवारी रात्री 10 वाजता फक्त स्टार प्लसवर. !

follow us