लॉरेन्स बिन्शोई गँग मास्टरमाईंड, दुबईत प्लॅन अन् जयपूरमध्ये गेम! सुखदेव सिंहांच्या हत्येची Inside Story

लॉरेन्स बिन्शोई गँग मास्टरमाईंड, दुबईत प्लॅन अन् जयपूरमध्ये गेम! सुखदेव सिंहांच्या हत्येची Inside Story

Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांची तब्बल 17 गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आली आहे. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होते. याचदरम्यान चर्चा करण्याच्या बहाण्याने अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येत त्यांच्यावर हल्ला केला आहे. घटनेनंतर सुखदेव सिंह यांना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे राजस्थानात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. (Lawrence Bishnoi gang has claimed responsibility for the murder of Sukhdev Singh Gogamedi.)

बिष्णोई टोळीच्या रोहित गोदाराने जबाबदारी घेतली :

काही महिन्यांपूर्वी त्यांना कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या संदर्भात त्यांनी जयपूर पोलिसांना लेखी तक्रार देऊन माहिती दिली होती. त्यात त्याला बिश्नोई टोळीचा गुंड संपत नेहरा याने धमकी दिल्याचे म्हटले होते. या हत्येनंतर आता बिष्णोई टोळीचा कुख्यात गुंड रोहित गोदाराने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. इंटरपोलने यापूर्वीच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार दुबईत राहून तो लॉरेन्सच्या सांगण्यावरून काम करतो.

20 सेकंदात रिकामं केलं मॅगजिन, राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या

बिष्णोई टोळीचा खास पोरगा दुबईत :

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा रोहीत गोदारा हा बिकानेर जिल्ह्यातील लुंकरनसार येथील रहिवासी आहे. 2010 पासून ते गुन्हेगारी जगतात सक्रिय आहेत. सुरुवातील छोटे छोटे गुन्हे केल्यानंतर तो लॉरेन्सच्या संपर्कात आला, त्यानंतर तो त्याच्या टोळीत सामील झाला. पोलिसांनी त्यांच्याविरोधात फिल्डिंग लावल्यानंतर रोहितने दिल्लीतून बनावट पासपोर्ट बनवला आणि 2022 मध्ये दुबईला पळून गेला. तेथून तो सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून टोळीतील सदस्यांशी संपर्कात राहतो. परदेशात बसलेल्या आपल्या पोरांना तो सुपारी देतो.

आनंदपाल सिंग आणि लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन

सुखदेव सिंग गोगामेडी उर्फ ​​सुखिया हे पंजाबचा कुख्यात गुंड आनंदपाल सिंगच्या एन्काउंटरनंतर चांगलाच चर्चेत आले होते. त्यांनी आठवडाभर आनंदपाल सिंग याच्या मृतदेहाजवळ बसून निदर्शने केली होती. त्यावेळी त्यांची अनेक भडकाऊ भाषणे व्हायरल झाली होती. त्यानंतर राजस्थानच्या जसवंतगड पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 332, 353, 307, 3 पीडीपीपी कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक काळ असा होता की आनंदपाल सिंग आणि लॉरेन्स बिश्नोई मिळून अनेक राज्यांतून खंडणी वसूल करायचे.

कोरोनाकाळात करोडोंना साक्षर करणारे बायजू रवींद्रन झाले बेघर; कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवली संपत्ती

एक हल्लेखोर ठार, दोघे घटनास्थळावरून फरार

जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, घटनेदरम्यान क्रॉस फायरिंगमध्ये मरण पावलेल्या एका हल्लेखोराची ओळख पटली आहे. नवीन सिंह शेखावत असे त्याचे नाव असून तो जयपूरच्या शाहपुरा भागातील रहिवासी होता. तो एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. याशिवाय दोन हल्लेखोरांनी स्कूटर हिसकावून पळ काढला. यातील एक जण सुखदेव सिंग यांच्या ओळखीचा होता, सुरक्षा रक्षकांशी बोलूनच सर्वजणांनी आतमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर गोगामेडींच्या सांगण्यावरून त्यांना आत बोलावण्यात आले होते. पुढे संवादादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज