Uddhav Thackeray : ‘इंडिया’चा चेहरा शरद पवार? पत्रकाराच्या गुगलीवर ठाकरेंचं ‘सेफ’ उत्तर

Uddhav Thackeray : ‘इंडिया’चा चेहरा शरद पवार? पत्रकाराच्या गुगलीवर ठाकरेंचं ‘सेफ’ उत्तर

Uddhav Thackeray : आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) महत्वाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election) या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. या बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच इंडिया आघाडीचा चेहरा शरद पवार असतील का, या पत्रकारांच्या प्रश्नावर सावध उत्तर दिले.

ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडीला आता समन्वयक चेहरा ठरवावा लागेल. सगळ्यांशी बोलून निर्णय घेऊ. मी सुद्धा या बैठकीत मत व्यक्त करणार आहे. सगळ्यांच्या सूचना घेऊन मत मांडणार आहोत. इंडियात मतभेद असणारे एकत्र आलेत. त्यामुळे बैठकीत चर्चा होईल. आता पुढील वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता वेळ आली असून समन्वयक, निमंत्रकांचा चेहरा ठरवावा लागेल. आमच्या डोळ्यांसमोर मोदी नाहीत तर देश आहे. लोकशाही जिवंत राहिल हा मुद्दा आहे, त्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : युतीचं महत्व शिका, मोदींसमोर कोण याचं उत्तर द्या; ठाकरे गटाने टोचले काँग्रेसचे कान

यानंतर पत्रकारांनी त्यांना इंडिया आघाडीचा चेहरा तुम्ही किंवा शरद पवार असतील का असा प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आता बैठक  होणार आहे. या बैठकीत चर्चा करू त्यानंतर याबाबत काय तो निर्णय घेता येईल. मी या बैठकीसाठी आलो आहे म्हटल्यानंतर मी सुद्धा या बैठकीत मत मांडणार आहे. त्यामुळे सर्वांचं मत विचारात घेऊन काय तो निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी स्वप्न पाहत नाही, ज्यांना पहायचंं त्यांना पाहू द्या

आमच्या डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. मी नेतृत्वाबाबत स्वप्न पाहत नाही. मुख्यमंत्रिपद मी जबाबदारी म्हणून स्वीकारलं होतं. ज्यावेळी पद सोडण्याची वेळ आली तेव्हा क्षणात सोडूनही दिलं, असे म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देशात सध्या ज्या घटना घडत आहेत त्यावरून लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमची त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज