Uddhav Thackeray : ‘युतीचं महत्व शिका, मोदींसमोर कोण याचं उत्तर द्या’; ठाकरे गटाने टोचले काँग्रेसचे कान

Uddhav Thackeray : ‘युतीचं महत्व शिका, मोदींसमोर कोण याचं उत्तर द्या’; ठाकरे गटाने टोचले काँग्रेसचे कान

Uddhav Thackeray : आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) महत्वाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election) या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आघाडीत धुसफूस वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने सामनातून आघाडीतील मुख्य पक्ष काँग्रेसला (Congress) शाब्दिक टोले लगावत मिठाचा खडा टाकला आहे. काँग्रेसनं युतीचं महत्व शिकून घ्यावं, असा सल्ला ठाकरे गटानं दिला आहे.

ज्या ठिकाणी स्वबळावर सत्तेत येऊ असे वाटते त्याठिकाणी काँग्रेस कुणालाच सोबत घ्यायला तयार होत नाही. या अहंकारात स्वतःबरोबर इंडियाचे नुकसान करतात असा बोल लावला जातो. ही जी काही प्रतिमा तयार झाली आहे ती काँग्रेसला मिटवावी लागेल. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड (Elections 2023) या राज्यांत इंडिया आघाडीचा नाही तर काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशी टीका या लेखात केली आहे.

Uddhav Thackery : आमचा प्रश्न अदानींना होता, गावभर चमचे का वाजताय?; ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका

इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसने युतीचे महत्व शिकायला हवे. या रथाला आज 27 घोडे आहेत पण सारथी नाही. त्यामुळे रथ अडकला आहे. इंडिया आघाडीला संयोजक, समन्वयक आणि निमंत्रक जो काही असेल तो हवा आहे. रथाचा सारथी आता नेमावा लागेल. 19 तारखेच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊनच पुढे पाऊल टाकावे लागेल, असा सूचक इशारा ठाकरे गटाने या लेखातून दिला आहे.

2024 च्या निवडणुकांसाठी इंडिया आघाडीचा चेहरा कोण, याचा फैसला आता करावा लागेल. मोदींसमोर कोण हा सुद्धा प्रश्न आहे. या प्रश्नाचेही उत्तर द्यावेच लागेल. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी भरपूर चेहरे आहेत, चॉइसच चॉइस आहे असे सांगणे म्हणजे दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है त्यातलाच हा प्रकार आहे. हजार आचारी व रस्सा भिकारी या भूमिकेतून आता बाहेर पडावे लागेल, अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाने इंडिया आघाडीतील घटकपक्षांना इशारा दिला आहे.

Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज