‘INDIA’ आघाडीत मिठाचा खडा! आधी जागा वाटप, नंतरच बैठक; अखिलेश यादव आक्रमक

‘INDIA’ आघाडीत मिठाचा खडा! आधी जागा वाटप, नंतरच बैठक; अखिलेश यादव आक्रमक

INDIA Alliance : राजस्थान(Rajasthan), मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह (Chhattisgarh)पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपनं (BJP)बाजी मारली. त्यानंतर आता लोकांच्या नजरा लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress)पराभव झाला. त्यामुळे आता विरोधी पक्ष ‘INDIA’ आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘INDIA’ आघाडीची बैठक बोलावली. त्यातच आता अखिलेश यादव (Akhilesh Yadav)यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या बैठकीला येण्यास नकार दिला आहे. आधी जागावाटप आणि नंतरच बैठक अशी अट घातली आहे. त्यामुळे आता त्यांची ही अट मान्य होणार का? हेच पाहावं लागणार आहे.

NARI मध्ये नोकरीची संधी, महिन्याला 64 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह तेलंगणा राज्याच्या निवडणुकांच्या निकालानंतर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांनी निवडणूक निकालानंतर आज (दि.6) ला इंडिया आघाडीची बैठक बोलावली होती. मध्यप्रदेश, छत्तीसगडसह राजस्थानमध्ये कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी(Mamata Banerjee), बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत आजच्या बैठकीला येणं टाळलं. त्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आली.

Sanjay Raut : उद्धव ठाकरे PM पदाचा चेहरा? राऊतांनी ‘सस्पेन्स’ ठेवला कायम

त्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी आता 16 डिसेंबरला बैठक बोलावली आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीत सहभागी होण्यासाठी सर्व नेत्यांना तयार करण्याची जबाबदारी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर सोपवली आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाला एकही जागा दिली नाही. 2018 मध्ये अखिलेश यादव यांच्या पक्षाचा उमेदवार जिथे जिंकला होता, त्या ठिकाणीही उमेदवारी दिली नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय वैर आपल्या सर्वांना माहितीच आहे. असं असतानाच आता ममता बॅनर्जी यांनीदेखील जुन्या पक्षाच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते.

नितीश कुमार यांनीही राज्यांच्या निवडणुकांसाठी इंडिया आघाडीचा कोणताही कार्यक्रम नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीदेखील प्रश्न उपस्थित केला आहे.

अखिलेश यादव यांनी सांगितले की, इंडिया आघाडीत आधी जागावाटप होईल आणि त्यानंतरच पुढील चर्चा होईल. त्यांनी असंही म्हटलंय की, इंडिया आघाडीपूर्वी ठरलं होतं की, जो त्या जागेवर प्रबळ असेल तो त्या ठिकाणी नेतृत्व करेल आणि इतर पक्ष त्याला पाठिंबा देतील. याच सूत्रावर भारत आघाडीला पुढे जावं लागणार आहे.

अखिलेश यादव इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याबद्दलची भूमिका घेतली नाही मात्र आता चर्चा आमच्या अटींवरच होईल, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. आता काँग्रेसकडून अखिलेश यादव यांची ही अट मान्य केली जाईल का? हे पाहावं लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube