‘पंकजाताई अन् माझा राजकीय संघर्ष संपला’; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

‘पंकजाताई अन् माझा राजकीय संघर्ष संपला’; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

Dhananjay Munde : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे आणि माझा राजकीय संघर्ष संपला असल्याचं मोठं विधान कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, काल राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम परळीत पार पडला. या कार्यक्रमाच्या मंचावर भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि कृषिमंत्री एकत्र पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमानंतर आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत संघर्ष संपल्याचं स्पष्ट केलं आहे.

संजय राऊतांकडून आरोग्य विभागाचे ‘पोस्टमार्टेम’ : तानाजी सावंतांवर 10 महाभयंकर भ्रष्टाराचाराचे आरोप

धनंजय मुंडे म्हणाले, महायुतीचं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे आणि माझा राजकीय संघर्ष संपला. आमच्यात राजकीय मतभेद होते ते सरकारमध्ये आल्यानंतर आल्याने संपले आहेत. पंकजाताई आणि मी एकत्र काम करावं हे सर्वांना वाटत होतं. शेवटी राजकारणात त्या वेळेस एकमेकांविरोधात विचाराने एकत्र होतो. महायुतीत विचाराने एकत्र आल्यानंतर बहीण भावामध्ये वेगळं अंतर पडायंच कारणचं नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Vijay Wadettiwar : ‘ईव्हीएम’बद्दलचा लोकांच्या मनातला संभ्रम दूर करा; वडेट्टीवारांचं सरकारला खुलं आव्हान

तसेच याआधीही पंकजाताई आणि मी वेगवेगळ्या कार्यक्रमात परळीत एकाच मंचावर आलो आहे. ज्या मजबूतीने जिल्ह्याचं आज मंचावर नेतृत्व पाहायाल मिळालं. त्याचा सर्वांनाच आनंद होत आहे. पंकजाताईंसह मलाही एकत्र आल्याचा आनंद असून पंचक्रोशीतल्या अनेकांना वाटतं होतं की, आम्ही आधी जसं एकत्र काम करत होतो तस करावं, असंही धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.

‘तळपता सूर्य अन् घामानं थपथपलेलं शरीर’; मनोज वाजपेयीने उलगडला’जोरम’ चा आव्हानात्मक प्रवास

दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त परळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर दिसून आले आहेत. बीडच्या राजकारणातले कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे मुंडे भाऊ-बहिणी एकाच मंचावर होते. या कार्यक्रमासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी धनंजय आणि पंकजा मुंडेंचा मिलाप घडवून आणला. एकाच हेलिकॉप्टरने सर्व नेते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. एवढंच नाहीतर बीडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा आवाहनही करण्यात आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज