‘धनंजय मुंडेंनी काकांसोबत जे केलं ते जगाला माहिती’; रोहित पवारांनी कडक शब्दांत सुनावलं

‘धनंजय मुंडेंनी काकांसोबत जे केलं ते जगाला माहिती’; रोहित पवारांनी कडक शब्दांत सुनावलं

Rohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या काकांसोबत जे केलं, ते जगाला माहिती, मी कधीच काकांविरोधात काम केलं नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांना चांगलच सुनावलं आहे. दरम्यान, विचार मंथन शिबीरातून रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनींही सुनावलं आहे. सांगलीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मोठी बातमी! भिंगार शहराचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा, खासदार विखेंची मोठी घोषणा

रोहित पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या काकांसोबत जे केलं, ते जगाला माहिती, मी कधीच काकांविरोधात काम केलं नाही. अजितदादा नाहीतर पण त्यांच्या कानाला कोन लागतं याचा अंदाज मला आहे. मी कधीच कोणाची जागा घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Assembly Election 2023: भाजपने सेमीफायनल जिंकली ! मोदींचा ‘मिशन 2024’चा रोडमॅप क्लिअर कसा झाला ?

क्रिकट मॅचमध्ये जसे दोन लोकं आऊट झाले की तिसऱ्या खेळाडूला खेळावं लागतं. अगदी तसंच मी सध्या खेळत आहे. माझं चांगलं खेळणं हेच काही लोकांना आवडत नाही. त्यामुळेच टीक-टिप्पणी करत असल्याचंही रोहित पवार म्हणाले आहेत.

वसुंधराराजे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किती? जाणून घ्या कुंडलीची स्थिती काय सांगते

ओबीसी-मराठा वाद लावण्याचा प्रयत्न :
राज्य सरकारकडून ओबीसी-मराठा वाद लावण्याचा प्रयत्न होत आहे. बीडमध्ये प्रोफेश्नल गुंडांनी जाळपोळ केली आहे. यामध्ये सरकारकडून ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं आहे, असं सुरु राहिलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हिंदु-मुस्लिम नाहीतर ओबीसी-मराठा होणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

पवारांचा नातू तरीही आमदारच…
मी पदासाठी कधी लढत नाही. महाविकास आघाडीत पवारांचा नातू असूनही मंत्री नव्हतो आमदारच होतो. पवार आडनावाचा मी कधी वापर नाही केला ज्यांनी मंत्रिपद मिळवली त्यांना विचारु शकता. काही नेते आधी राजकारणात आले नंतर व्यवसायात आले.(अजितदादांवर बोलत नाही) व्यवसायाच्या दृष्टीकोनातून त्यांना संघर्ष करावा लागला नाही पण मला व्यवसायातून राजकारणात यायला संघर्ष करावा लागला, असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube