Maratha Reservation : मनोज जरांगेंना तातडीने रुग्णालयात हलवलं…नेमकं काय झालं?

Maratha Reservation : मनोज जरांगेंना तातडीने रुग्णालयात हलवलं…नेमकं काय झालं?

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरा करीत आहेत. दौऱ्यादरम्यान आयोजित सभेतून मनोज जरांगे राज्य सरकारसह ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेत आहेत. आज ते बीड दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटलांना तातडीने बीडमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

नवं वाळू धोरण ते तलाठी भरती गैरप्रकार; अधिवेशनात थोरातांनी विखेंचं सगळचं काढलं

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत दोन वेळा आमरण उपोषण केलं आहे. या दोन्ही उपोषणादरम्यान, मनोज जरांगे यांना सरकारने आश्वासित केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडल्याचं दिसून आलं आहे. मात्र, दुसऱ्या उपोषणावेळी जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभर मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी दौरा सुरु केला आहे. याच दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत त्यांना काल नांदेडमध्ये उशिरापर्यंत सभा घ्यावी लागली आहे.

‘ठोकर लगती है तो दर्द होता है तभी मनुष्य सीख पाता है’, ‘पंचायत 3’चा फर्स्ट लूक रिलीज

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि ओबीसी हक्कांसाठी भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्याकडून एल्गार सभाचं आयोजन केलं जातं. जरांगेही मागे हटालया तयार नाहीत. तिसऱ्या टप्यातील दौऱ्यानंतर आता त्यांनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची घोषणा केली. सध्या मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील प्रवास सुरु आहे.

Rajasthan News : मला मुख्यमंत्री करा; वसुंधरा राजेंचा थेट अमित शाहंना फोन

नांदेडमध्ये आयोजकांवर गुन्हा :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजित जाहीर सभेतून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर सडकून टीका करीत असल्याचं दिसून येत आहेत. काल नांदेड, लातूरमध्ये मनोज जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. लातुरमध्ये जरांगेंची सभा यशस्वी पार पडली. मात्र, नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत सभा सुरु असल्याने सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री 10 नंतरही सभा सुरुच ठेवल्याने 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज