नवं वाळू धोरण ते तलाठी भरती गैरप्रकार; अधिवेशनात थोरातांनी विखेंचं सगळचं काढलं

नवं वाळू धोरण ते तलाठी भरती गैरप्रकार; अधिवेशनात थोरातांनी विखेंचं सगळचं काढलं

Balasaheb Thorat On Radhakrushna Vikhe : राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच वाकयुद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळालं आहे. मंत्री विखे पाटलांनी राबवलेलं नवं वाळू धोरण ते तलाठी भरती प्रक्रियेत घडत असलेल्या गैरप्रकारांवरुन बाळासाहेब थोरातांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी, सिंघम अन् किंग खान केंद्राच्या रडारवर; तंबाखूच्या जाहिरातीसाठी थेट धाडली नोटीस

बाळासाहेब थोरात म्हणाले, नव्या महसूल मंत्र्यांनी घोषणा केली की आता 600 रुपयात घरपोच वाळू मिळेल. मलाही आनंद वाटला पण सभागृहातल्या आमदारांनी छाती ठोकपणे सांगावं की 600 रुपये दराने वाळू मिळते का? महसूल मंत्र्यांनी जुन्याच वाळू तस्करांना महसूलमंत्र्यांनी सन्मानाने ठेके दिले आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, सर्कल, तलाठी या सर्वांना डेपोचे रक्षण करण्याची वेळ आलीयं. ज्यांना ठेके देण्यात आले त्यांच्याकडूनच वाळू वाहतुकीचे गैरप्रकार सुरू झाल्याचा आरोप थोरात यांनी यावेळी केलायं.

वाळूची वाहतूक रात्री करता येत नसताना देखील सर्रास रात्रभर वाळूची वाहतूक सुरू आहे. वाळूच्या डेपो मधूनच वाळूच्या चोऱ्या व्हायला लागल्या. हे सर्व करणारे लोक महसूलमंत्र्यांच्या मर्जीतले आहे, असाही घणाघात थोरात यांनी केला. वाळूची ऑनलाईन नोंदणी हा सुद्धा गमतीशीर प्रकार झाला आहे. ऑनलाइन नोंद करायला गेल्यावर वाळू उपलब्ध नसते, वाळू कधी उपलब्ध होणार? किती वाजता ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार? किती वाजता संपणार? हे ठराविक लोकांनाच माहित असते, अशा लोकांचे धक्कादायक रॅकेट राज्यभर निर्माण झाले असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Aalandi Samadhi Sohala : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा; आळंदी नगरी दुमदुमली

नव्या धोरणांमुळे सरकारलाच भुर्दंड :
नव्या धोरणामुळे उलट सरकारला भुर्दंड बसत असून गरीब माणसाला वाळू उपलब्ध होत नाही त्याला काळ्या बाजारातूनच वाळू विकत घ्यावी लागते, त्यालाही अतिरिक्त भुर्दंड या नव्या धोरणामुळे बसतोयं. रात्री सुरू असलेल्या वाळू तस्करीमुळे माझ्या मतदारसंघात वाळूची वाहतूक करणारी एक गाडी विहिरीत बुडाली त्यात चालकाचा मृत्यू झाला, रात्रीची वाळू वाहतूक कुठेही थांबलेली नाही. महसूल विभाग आणि तस्कर यांच्या संगनमताने हे सुरू आहे. जे वाळूचे खरे गुन्हेगार आहेत त्यांना संरक्षण देण्याचे काम महसूलमंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला.

तलाठी भरतीतील गैरप्रकाराला जबाबदार कोण?
तलाठी भरतीच्या परीक्षेपोटी विद्यार्थ्याकडून शंभर कोटी रुपये गोळा झाले मात्र तरीही सरकारला या परीक्षेचे व्यवस्थापन धड करता आले नाही. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्याला नांदेड आणि नांदेडच्या विद्यार्थ्याला अमरावती असे परीक्षा केंद्र देण्यात आले, तलाठी भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? असंही थोरात म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube