Aalandi Samadhi Sohala : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा; आळंदी नगरी दुमदुमली

Aalandi Samadhi Sohala : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा; आळंदी नगरी दुमदुमली

Aalandi Samadhi Sohala : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा (Aalandi Samadhi Sohala) आज साजरा होत आहे. यासाठी माऊलींच्या आळंदीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी संपूर्ण विश्वाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिल्यानंतर 21 व्या वर्षीच माऊलींनी समाधी घेतली. तो दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी. त्यामुळे या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो. तर यावेळी माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा आज साजरा होत आहे.

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज

हा सोहळा कार्तिकी अष्टमीपासून श्री गुरू हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो. तर कार्तिकी अमावस्येपर्यंत हा सोहळा सुरू असतो. यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत. यावर्षी हा सोबळा मंगळवारी 5 डिसेंबरला सुरू झाला आहे. त्यात 9 तारखेला कार्तिकी एकादशी आणि आज 11 डिसेंबरला माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा आज साजरा होत आहे. उद्या 12 डिसेंबरला हा सोहळा संपन्न होणार आहे.

Supreme Court मध्ये आज सुनावणी; कलम 370 रद्द करणे, योग्य की अयोग्य ठरणार

काल रविवारी 10 डिसेंबरला या सोहळ्यातील श्रींची वैभवशाली रथोत्सव मिरवणुक काढण्यात आली. यावेळी नगरप्रदक्षिणा करण्यासाठी रथोत्सावाच्या मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आज मुख्य सोहळा पार पडणार आहे. त्यामध्ये माऊलींच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी आणि घंटानाद करण्यात येणार आहे. त्यानंतर किर्तन होणार आहे.

Horoscope Today: ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

दरम्यान प्रशासनाकडून या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये इंद्रायणीमध्ये स्नानाला जाणाऱ्या भाविकांसाठी रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तर मंदीराला आकर्षक विद्युत रोषणाई कऱण्यात आली आहे. आळंदीसह पंचक्रोशीमध्ये या सोहळ्यासाठी रेलचेल सुरू आहे. तर राज्यभरातून भाविकांनी या सोहळ्याला अलोट गर्दी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube