Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हिवाळा (Weather Update) जरी सुरू असला. तरी म्हणावे तशी थंडी पडलेली नव्हती. त्यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण देखील निर्माण झालेलं नव्हतं. या दरम्यान अवकाळी पावसाने राज्यात शेतीचं मोठं नुकसानही झालं. मात्र आता राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज…

तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होणार आहे. तर कोकणपट्ट्यांमध्ये तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे. तसेच विदर्भ मुंबई यांच्यासह राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट नोंदवली जाणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश दरम्यान राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.

Supreme Court मध्ये आज सुनावणी; कलम 370 रद्द करणे, योग्य की अयोग्य ठरणार

दुसरीकडे आग्नेय अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मालदीव जवळ समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण देखील असणार आहे. त्यामध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी पहाटेच्या वेळी तापमानात मोठी घट होईल. तर कोकण आणि मुंबई या भागामध्ये रात्रीच्या वेळी तापमानात घट दिसून येईल दरम्यान थंडीचा कडाका वाढणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. रब्बी हंगामासाठी ही थंडी पोषक ठरणार आहे.

Horoscope Today: ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube