26 जानेवारीला होणार VD14 चा प्री-टीझर रिलीज़, विजय देवरकोंडा–रश्मिका मंदाना स्टारर.
सलग यशस्वी आणि कौतुकास्पद चित्रपटांनंतर आता विजय देवरकोंडा त्याच्या पुढील मोठ्या चित्रपट VD14 साठी सज्ज झाला आहे.
VD14’s pre-teaser release to be held on January 26 : विजय देवरकोंडा आज भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात टॅलेंटेड आणि गुड-लुकिंग अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याची दमदार स्क्रीन प्रेझेन्स, अभिनय आणि ऑरामुळे त्याला देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळाली आहे. तो ज्या चित्रपटाशी जोडला जातो, त्या चित्रपटाचा दर्जा आपोआपच वर जातो. सलग यशस्वी आणि कौतुकास्पद चित्रपटांनंतर आता विजय त्याच्या पुढील मोठ्या चित्रपट VD14 साठी सज्ज झाला आहे. राहुल सांक्रित्यन दिग्दर्शित आणि पुष्पाचे मेकर्स मायथ्री मूव्ही मेकर्स निर्मित हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच प्रेक्षक त्याच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत.
एक्साइटमेंट आणखी वाढवताना मेकर्सनी आज सोशल मीडियावर एक इंटरेस्टिंग प्री-टीझर व्हिडिओ शेअर केला असून, त्याने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बसलेली दिसते, ती विजय देवरकोंडाची व्यक्तिरेखा असल्याचं मानलं जात आहे. जिची पाठ कॅमेऱ्याकडे आहे आणि तिच्यावर जखमांचे व गोळी लागल्याचे निशाण दिसतात. टीझरमध्ये लिहिलं आहे, “The Legend of the Cursed Land” चं नाव 26.1.26 रोजी उघड होणार आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “उद्या शांतता तुटेल, त्याचं नाव सर्वात मोठ्या आवाजात बोलेल
वन विभागातील महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली; बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने विचारला जाब
इतकी खास तारीख निवडल्यामुळे उत्सुकता आणखी वाढली असून, चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या कथेशी संबंधित खोल अर्थ किंवा संकेतांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या या मोठ्या घोषणेमुळे विजय देवरकोंडाच्या पुढील चित्रपटाबाबतचा उत्साह शिखरावर पोहोचला आहे आणि हा खुलासा त्याच्या चाहत्यांसाठी सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या क्षणांपैकी एक ठरणार आहे. दरम्यान, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना, ज्यांनी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारख्या चित्रपटांत एकत्र काम करत त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. हे दोघे या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या बातमीने एक्साइटमेंटमध्ये आणखी भर पडली असून, ही लोकप्रिय जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
