Winter Session : ऐन गुलाबी थंडीत वाढणार नागपूरचे तापमान; हिवाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

  • Written By: Published:
Winter Session 2023

Winter Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये या अधिवेशनाचे बिगुल वाजणार आहे. 7 ते 20 डिसेंबर असे 14 दिवस हे अधिवेशन पार पडणार आहे. यात चार दिवस सुट्ट्या आणि दहा कामकाज असे हे अधिवेशन होणार आहे.

सध्या चर्चेत असलेले नाशिक-पुणे ड्रग्ज प्रकण, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्था या मुद्यांवरुन अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय या अधिवेशनात अतिरिक्त मागण्याही मांडण्यात येणार असून विनियोजन विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

RBI चा राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीला दणका, अडीच कोटी रुपयांचा ठोठावला दंड 

10 दिवसांच्या कामकाजामुळे विरोधक आक्रमक :

हिवाळी अधिवेशचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी शेतकरी, मजूर, बेरोजगार आदी प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी किमान तीन आठवड्यांचे अधिवेशन आयोजित करण्याची मागणी करण्यात होती. मात्र, हे सत्र 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाल आहेत.

हे अधिवेशन विदर्भात दोन महिने चालले पाहिजे, असे म्हणणारे आज सत्तेत आहेत. फडणवीस आज सत्तेत आहेत. ते विदर्भातील आहेत. त्यांनी नागपूर करारानुसार अधिवेशन घ्यावे, हिवाळी अधिवेशन दोन महिने चाललं पाहिजे, असं पटोले म्हणाले.

शेतकरी, मजूर, बेरोजगार, तरुण अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी किमान तीन आठवड्यांचे अधिवेशन आयोजित करावे. यावर अंतिम निर्णय सल्लागार समिती घेईल, मात्र राज्य सरकारने दहा दिवसांत अधिवेशन संपवू नये, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

Tags

follow us