‘मर्दानी 3’ हा चित्रपट राणी मुखर्जीच्या दीर्घ आणि प्रेरणादायी कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा

माझ्या कारकिर्दीच्या 30व्या वर्षात मर्दानी 3 प्रदर्शित होणं, सतत मेहनत करत राहण्याचा आणि चांगलं काम करत राहण्याचा माझ्यासाठी एक संकेत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 01 12T150613.590

Rani Mukerji shares an emotional note ahead of the release of Mardaani’s third episode : ‘माझ्या कारकिर्दीच्या 30व्या वर्षात मर्दानी 3 प्रदर्शित होणं, सतत मेहनत करत राहण्याचा आणि चांगलं काम करत राहण्याचा माझ्यासाठी एक संकेत आहे,’ असे भावनिक शब्द अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी व्यक्त केले आहेत. 2026 मध्ये मर्दानी 3च्या माध्यमातून राणी मुखर्जी आपल्या शानदार चित्रपट कारकिर्दीची 30 वर्षे साजरी करणार आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीतील पथदर्शक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी मुखर्जी यांनी गेल्या तीन दशकांत नेहमीच ठाम, स्वावलंबी आणि बळकट महिलांच्या भूमिका साकारत समाजातील रूढ कल्पनांना आव्हान दिलं आहे. आधुनिक भारतीय स्त्रीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या राणी यांनी सिनेमा हे सन्मान, समानता आणि प्रतिष्ठेचं प्रभावी माध्यम बनवलं आहे.

 

आपल्या लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर फ्रँचायझी मर्दानीच्या तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनापूर्वी राणी मुखर्जी यांनी एक भावनिक नोट शेअर केली आहे. मर्दानी ही भारतातील एकमेव महिला-प्रधान फ्रँचायझी असून, देशातील एकमेव महिला पोलीस अधिकारी केंद्रस्थानी असलेली चित्रपट मालिका आहे. विशेष म्हणजे, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील ही एकमेव यशस्वी महिला-प्रधान थिएटर रिलीज फ्रँचायझी मानली जाते.

ब्रेकिंग : झेडपीच्या निवडणुकांना पुन्हा ‘ब्रेक’; सुप्रीम कोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य

या भावनिक नोटमध्ये राणी मुखर्जी यांनी आपल्या 30 वर्षांच्या सिनेमाई प्रवासाचा मागोवा घेतला असून, मर्दानी 3 हा चित्रपट त्यांच्या या दीर्घ आणि प्रेरणादायी कारकिर्दीचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मर्दानी 3कडे केवळ एका चित्रपट म्हणून नाही, तर राणी मुखर्जी यांच्या शानदार कारकिर्दीच्या 30 वर्षांच्या उत्सवाच्या सुरुवातीच्या रूपात पाहिलं जात आहे.

follow us