Balam Subedar : ‘सुबेदार’साठी ‘बलम सुबेदार’मध्ये Anil Kapoor यांचा दमदार स्वॅग कमबॅक

Balam Subedar : प्राईम व्हिडिओ इंडिया आणि टी-सिरिझ यांनी आज आगामी प्राइम ओरिजिनल चित्रपट ‘सुबेदार’मधील नवे अधिकृत गाणे ‘बलम सुबेदार’

  • Written By: Published:
Balam Subedar

Balam Subedar : प्राईम व्हिडिओ इंडिया आणि टी-सिरिझ यांनी आज आगामी प्राइम ओरिजिनल चित्रपट ‘सुबेदार’मधील नवे अधिकृत गाणे ‘बलम सुबेदार’ प्रदर्शित केले. या गाण्यात अनिल कपूर ‘सुबेदार अर्जुन मौर्य’ यांच्या भूमिकेत दिसत आहेत, तर खुशबू सुंदर‘सुधा’ची भूमिका साकारताना दिसतात. आयकॉनिक ट्रॅकचा हा नव्या ढंगातील अवतार ऐकल्यानंतर तो दीर्घकाळ तुमच्या ओठांवर राहील, यात शंका नाही. रीइमॅजिन केलेले हे गाणे सुबेदार अर्जुन मौर्य आणि त्यांच्या पत्नी सुधा यांच्या नात्याची खास झलक दाखवते. सुधाला आपल्या सुबेदारचा असलेला अभिमान आणि तिचे प्रेम अर्जुनला वर्दीच्या बाहेरही कशी ताकद देते, हे या व्हिडिओतून प्रभावीपणे मांडले आहे.

हे गाणे अर्जुन आणि सुधाच्या नात्याला केंद्रस्थानी ठेवते. सुधाचा आपल्या सुबेदारवरील अभिमान आणि दोघांची सहज केमिस्ट्री अर्जुन मौर्यच्या व्यक्तिरेखेला भावनिक गहिरेपणा देते. एक असा माणूस जो वर्दीत सन्मान मिळवतो आणि घरी खरे प्रेम जपतो. दृश्यांमधून नॉस्टॅल्जिया आणि भावनिक क्षणांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. ‘बलम सुबेदार’चे संगीत रुत्विक तलाशिलकर यांनी दिले आहे. या रिक्रिएटेड आवृत्तीला जीडी कौर यांनी आवाज दिला आहे. हे गाणे मूळतः राज मावर यांनी रियल म्युझिक प्रॉडक्शनसाठी तयार केले होते. नव्या व्हर्जनचे बोल यंगवीर यांनी लिहिले असून संगीत पर्यवेक्षण आकाशदीप सेनगुप्ता यांनी केले आहे.

‘त्या’ अधिकाऱ्याला नेमकं कोणाचा फोन आला? आमदार रोहित पवारांनी वेगळाच संशय व्यक्त केला…

‘सुबेदार’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. चित्रपटात अनिल कपूर आणि राधिका मदन मुख्य भूमिकेत आहेत. तसेच सौरभ शुक्ला, आदित्य रावल , फैसल मल्लिक, मोना सिंग आणि खुशबू सुंदर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘सुबेदार’ हा चित्रपट 5 मार्च रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये भारतासह 240 हून अधिक देश व प्रदेशांमध्ये विशेषतः प्राइम व्हिडिओ इंडियावर प्रदर्शित होणार आहे.

follow us