‘सरकार पडणार’ आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झालीयं’; राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर

‘सरकार पडणार’ आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झालीयं’; राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर

Radhakrushna Vikhe On Aaditya Thackeray : सरकार गेल्याच्या वैफल्याने आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टोलेबाजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी केली आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी येत्या 31 डिसेंबरला सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी निशाणा साधला आहे. विखे यांनी बारामतीतून माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

‘रेड्डी’राजकडून घोषणांची अंमलबजावणी; महिलांना मोफत बस ते विमा योजनेच्या अनुदानात वाढ

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे यांना सरकार गेल्याचं वैफल्य आहे, त्यामुळेच ते आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत. त्याचं त्यांना वैफल्य असून या वैफल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टोलेबाजी राधाकृष्ण विखेंनी केली आहे.

कांदा प्रश्नी फडणवीसांची केंद्राच्या दरबारी धाव : मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार?

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवली असेल. पण, हा थोड्या दिवसांचा खेळ आहे. ३१ डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणार, असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावरुन आता राधाकृष्ण विखेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Gopichand Padalkar : ओबीसी-भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहा; भुजबळांसाठी पडळकर मैदानात

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे यांनी यावेळी बोलताना इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. असे जे प्रकार घडत चालले आहेत. असेच जर प्रकार घडत गेले तर सद्यस्थितीत गंभीर प्रश्न निर्माण होतात.

Rohit Sharma : हार्दिकला डच्चू? टी 20 संघाची कमान पुन्हा रोहितच्या हाती, BCCI निर्णयाच्या तयारीत

काही लोकांच्या भावना होत्या, त्यामुळे ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मात्र आता हा प्रश्न संपलेला आहे. भविष्यकाळात अशा घटना होऊ नयेत यामुळे दक्षता घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

ऐन थंडीत राजकारण तापलं! ‘महुआवर अन्याय अन् लोकशाहीची हत्याच’; ममता बॅनर्जी भडकल्या

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जी लोक काही वक्तव्य करत आहेत. त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वैमनस्य तयार होणं हे गोष्ट आपल्या महाराष्ट्राला परवडणारी नाही. प्रत्येकाने आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहिल्यावर त्यांनी जाहीर वक्तव्य करणे थांबवली पाहिजेत, असंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube