‘रेड्डी’राजकडून घोषणांची अंमलबजावणी; महिलांना मोफत बस ते विमा योजनेच्या अनुदानात वाढ

‘रेड्डी’राजकडून घोषणांची अंमलबजावणी; महिलांना मोफत बस ते विमा योजनेच्या अनुदानात वाढ

Revanth Reddy : तेलंगणामध्ये बीआरएसचे केसीआर यांना धोबीपछाड देत रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी घोषणांची अंमलबजावणी केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रेवंथ रेड्डी यांनी महिलांसाठी मोफत बस प्रवास सुविधेचा प्रारंभ केलायं. तसेच राजीव आरोग्यश्री विमा योजना 5 लाखांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.

चर्चेतील नाव गायब, भाजपकडून धक्कातंत्राचा वापर : ‘विष्णू देव साय’ होणार छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

रेवंथ रेड्डी यांनी राजीव आरोग्यश्री योजनेचे पोस्टर आणि लोगोचे प्रकाशन केलं आहे. सर्व महिलांनी संपूर्ण राज्यात TSRTC बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी महालक्ष्मी योजनेचा वापर करण्याचं आवाहनही रेवंथ रेड्डी यांनी केलं आहे. 9 डिसेंबर हा दिवस विशेष असून तेलंगणातील लोकांसाठी ऐतिहासिक महत्त्व आहे.

पुण्याचे बँकॉक होतेय, तुमचे नवे पालकमंत्री कुठे आहेत ? संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचले !

9 डिसेंबर 2009 रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत घोषणा केली होती की, लोकांच्या अपेक्षांचा आदर करून केंद्र तेलंगणा राज्य निर्माण करणार आहे. सोनिया गांधी यांचाही या दिवशी वाढदिवस आहे ज्यांनी लोकांना अभिमानाने ते तेलंगणा राज्यातील असल्याचे सांगण्याची संधी दिली असल्याचं रेवंथ रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

Javed Akhtar : गीतकार अन् लेखक जावेद अख्तर यांना मिळणार यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार

तेलंगणात तीन नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती यातील सर्वात मोठे नाव म्हणजे रेवंत रेड्डी यांचेच होते. याशिवाय भट्टी विक्रमार्का मल्लूही शर्यतीत होते. तब्बल 1400 किलोमीटरच्या पदयात्रेनंतर मल्लू चर्चेत आले होते. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी हेही या शर्यतीत होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा रेवंथ रेड्डी हेच होते.
रेवंथ रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचाही सामना करावा लागला.

Maharashtra Politics : फडणवीसांनी अजितदादांना पत्र का दिलं? पृथ्वीराजबाबांनी सांगितलं धक्कादायक कारण

ज्येष्ठ नेते एन उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा समावेश आहे. या लोकांनी रेवंथ रेड्डी यांच्या उमेदवारीला विरोध केला, भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डी यांच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे लक्ष वेधलं होतं. मात्र, काँग्रेसकडून रेवंथ रेड्डी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube