Gopichand Padalkar : ओबीसी-भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहा; भुजबळांसाठी पडळकर मैदानात

Gopichand Padalkar : ओबीसी-भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहा; भुजबळांसाठी पडळकर मैदानात

Gopichand Padalkar : पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal)पहिली ओबीसी एल्गार सभा (OBC Elgar Sabha)ही पुणे (Pune)जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये (Indapur)सुरु आहे. त्याच सभेमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जो ओबीसींच्या हिताचं, जो भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करतोय त्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन इंदापूरच्या ओबीसी एल्गार सभेत केलं आहे.

सोनिया गांधींचे 77 व्या वर्षात पदार्पण : PM मोदींनी दिल्या आरोग्यपूर्ण अन् दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये आयोजित ओबीसी एल्गार सभेत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं जाहीर कौतुक केलं आहे.

Income Tax Raid : 300 कोटींचं घबाड सापडलेले कोण आहेत धीरज साहू?

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, या देशात जेवढी आंदोलनं झाली, क्रांती झाल्या त्या सगळ्या क्रांती होळकर, फुले, शाहु आणि आंबेडकर यांच्याच विचारावरती झाल्या. कारण या सर्व चळवळीचा डीएनए होळकर, फुले, शाहु आणि आंबेडकर यांचाच होता.

आज सगळे ओबीसी एकत्र व्हायला लागलेत याचं सगळं श्रेय छगन भुजबळ यांनाच जातं. या वाघानं डरकाळी फोडली आणि गावगाड्यातला, पालामध्ये राहणारा पोरगा आता तरतरीत झाला आहे. त्याला सुद्धा कळालं की, आमचे हक्क आमचे अधिकार जतन करुन ठेवले पाहिजेत. सगळ्यांनी छगन भुजबळ यांचे सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे.

व्यासपीठावर सगळे ओबीसी नेते आहेत पण आपण छगन भुजबळ यांचे कौतुक करतोय म्हटल्यावर काही जणांना जरा वेगळंच वाटत असेल. पण जो ओबीसींच्या हिताचं, जो भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करतोय त्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहिलं पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. त्याच्यामुळे छगन भुजबळांच्या पाठिमागे अनेक लोकं आहेत, असेही यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube