Income Tax Raid : 300 कोटींचं घबाड सापडलेले कोण आहेत धीरज साहू?

Income Tax Raid : 300 कोटींचं घबाड सापडलेले कोण आहेत धीरज साहू?

Dheeraj Sahu income tax raid : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घरावर आयकर विभागाने (income tax raid) छापे टाकला. या छापातून आयकर विभागाला मोठ घबाड हाती लागलंय. यातून भाजपने काँग्रेसलाच घेरलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांनी यावर ट्विट केलंय. ‘जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है’, असं ते ट्विट आहे.

खासदार धीरज साहू यांच्या निकटवर्तीयांकडून झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधून आतापर्यंत 300 कोटींहून अधिक रोख रक्कम मिळालीय. या कारवाईमुळे देशातील राजकारण ढवळून निघालंय. भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय.

कशी झाली कारवाई?
करचुकवेगिरी प्रकरणात आयकर विभागाने त्यांचे घर, कार्यालय आणि कारखान्यावर छापे टाकलेत. छाप्याच्या पहिल्या दिवशी आयकर विभागाला 30 कपाटांमध्ये भरलेल्या नोटांचे बंडल सापडले, दुसऱ्या दिवशीही नोटांनी भरलेल्या 156 बॅगा सापडल्या. त्यानंतर आयकर विभागाला नोटा मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या.

Gauri Lankesh Murder Case : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

4 मशीन खराब, 12 मशिनने मोजणी
बराच वेळ नोटा कपाटात ठेवल्याने ओलसर झाल्या होत्या. यामुळे नोटा एकमेकांना चिकटल्या होत्या. नोटा मोजताना चार मशीन बिघडल्या होत्या, त्यामुळे भुवनेश्वरहून नवीन मशिन मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये 6 मोठ्या आणि 6 लहान मशिनचा समावेश होता.

Delhi : ‘आप’ सरकारमध्ये खांदेपालट; आतिशी तब्बल 13 खात्यांच्या मंत्री

कोण आहेत धीरज साहू?
युवक काँग्रेसमधून धीरज साहू यांनी राजकारण सुरू केले होते. 1977 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा भाऊ शिवप्रसाद साहू हे काँग्रेसच्या तिकिटावर रांचीमधून दोनदा लोकसभा खासदार राहिले आहेत तर धीरज साहू हे काँग्रेसचे तीन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. जुलै 2010 मध्ये धीरज साहू पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले होते. 2018 मध्ये ते तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेसचे एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांचे वडील रायसाहेब साहू यांचा स्वातंत्र्यलढ्यात देखील सहभाग होता.

40 एकरमध्ये कंपनीचा पसारा
बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड ही भुवनेश्वरपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या बौध जिल्ह्यात आहे. ही कंपनी 40 एकरांवर पसरलेली आहे. अमित साहू, रितेश साहू आणि उदय शंकर प्रसाद अशी या ग्रुपच्या संचालकांची नावे आहेत. ही देशातील सर्वात मोठी मद्य निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube