दीड लाख उत्पादन खर्च, हातात आले फक्त 50 हजार रुपये, कांदा निर्यात बंदीचा बळीराजाला फटका
अहमदनगर : दोन एकर कांदा (Onion) लावला पण अवकाळीने हजेरी लावली, काही कांदा सडला तर काही शिल्लक राहिला. कांदा विकून उसनवारी तसेच घेतलेलं कर्ज फिटेल, अशी आशा होती. मात्र इथंपण नशिबाने साथ दिली नाही. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आणि भाव कोसळले. कर्ज घेऊन दीड लाख रुपये कांदा पिकासाठी खर्च केले अन् आज बाजारात फक्त 50 हजार रुपये हातात आले. आता तुम्हीच सांगा कसं कर्ज फेडू अन् कसं आम्ही घर चालवायचं? असं म्हणत कांदा उत्पादक शेतकऱ्याचे डोळे पाणावले. दरम्यान शेतकऱ्यांचा विचार करता सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करू लागले आहे.
उद्वव ठाकरे गटाने केली शिंदेंच्या २३ आमदारांची कोंडी!
अवकाळीमुळे आधीच हवालदिल झालेला कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने आता शेतकरी आक्रमक होऊ लागले आहे. सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर गडगडल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. यातच नगर येथील नेप्तीमध्ये कांदा लिलाव सुरु होता. मात्र यावेळी कांदा विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याच्या दराने पाणी आणले.
Delhi : ‘आप’ सरकारमध्ये खांदेपालट; आतिशी तब्बल 13 खात्यांच्या मंत्री
आम्ही कसं जगायचं…
बँकेतून कर्ज घेऊन कांद्याचे पीक घेतले. पीक आल्यावर ते विकून बँकेचे कर्ज फेडू व काहीशी रक्कम हाती राहील त्यातून घरगाडा चालवू असं वाटत होते. मात्र अचानक सरकारने कांद्याबाबत निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळं विक्रीस आणलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळेनासा झाला. 40 ते 50 रुपये किलो असलेला कांदा आता थेट 15 ते 17 रुपये किलोने विकावा लागला. यामुळे खर्च केलेली रक्कम देखील मिळाली नाही,स उलट आता घेतलेले कर्ज कसं फेडायचं हाच प्रश्न आता आमच्यासमोर मांडला आहे.
शेतकरी व्यथित…
जिल्ह्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती होती तर आम्ही ठिबक, तुषार लावून पीक घेतले मात्र अवकाळीने कांद्याचे पीक खराब झाले. दोन एकरात कांदे लावले व एक एकर पूर्ण पिकाचे नुकसान झाले. आता जे पीक हाती आले ते बाजरात विक्रीस घेऊन आलो तर सरकारच्या निर्णयाने आता काही पॆसे हातात येणार नाही. म्हणजे आम्ही पिकासाठी केलेला खर्च देखील आज आम्हाला निघाला नाही आता त्या कर्जासाठी जमिनी विकायची वेळ आमच्यावर आली असल्याचे यावेळी व्यथित झालेल्या शेतकऱ्याने सांगितले.